Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२६

*बोरगाव येथे श्रीनाथ विद्यालयात ‘नशामुक्त भारत’ प्रतिज्ञा अभियान संपन्न.*

 *अकलूज प्रतिनिधी*

  *केदार   लोहकरे* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


रयत शिक्षण संस्थेच्या श्रीनाथ विद्यालय व कै.विजयकुमार उर्फ बाबासाहेब शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय बोरगाव (ता.माळशिरस) येथे 'नशामुक्त भारत’ प्रतिज्ञा अभियानाचे आयोजन करण्यात आले.या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून देण्यात आले.प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र अकलूज यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमात राजयोगिनी ब्रह्माकुमारी शिवरात्री दीदी यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांचे शारीरिक,मानसिक,सामाजिक व शैक्षणिक जीवनावर होणारे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले.व्यसनांपासून दूर राहून निरोगी,आनंदी व संस्कारक्षम जीवन जगण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.


          यावेळी विद्यार्थ्यांनी मी कोणत्याही प्रकारचे व्यसन करणार नाही तसेच इतरांनाही व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करीन या भावनेने नशामुक्तीची प्रतिज्ञा घेतली.या अभियानात विद्यालयातील सुमारे ७०० विद्यार्थी तसेच शिक्षकवृंद उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

              या कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य आर.टी. लष्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी.एम.वाघमारे यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा