*करमाळा तालुका --प्रतिनिधी*
*आलिम शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
आमदार नारायण आबा पाटील यांनी अधिकारी व शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत दिल्या महत्त्वाच्या सूचना...दहिगाव उपसा सिंचन योजनेचे सध्या पावसाळी आवर्तन सुरू असून,या आवर्तनादरम्यान शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी तसेच पाटबंधारे विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी आज प्रत्यक्ष कॅनोलवर जाऊन पाहणी केली.
विशेष म्हणजे,यावेळी आमदार नारायण आबा पाटील यांनी स्वतः बुलेट चालवत कॅनोलच्या बाजूने प्रवास करत योजनेतील प्रत्येक बाब बारकाईने नजरेखालून घातली. तब्बल चार तास चाललेल्या या पाहणी दौऱ्यात त्यांनी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या.
पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी शेतकरी सायपण तसेच मोटारीद्वारे मुख्य चारीतून पाणी घेताना आढळून आले.दहिगाव डीसी चेंबर,शेटफळ-चिकलठाण रोड,जेऊरवाडी-हजारवाडी,कुंभेज-खडकेवाडी, देवळाली, सरफडोह, वरकटणे आदी मुख्य चारींच्या परिसराची आमदार पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता व्ही.जी.देवकाते यांना योजनेच्या आवर्तनासंदर्भात आवश्यक त्या महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.शेतकऱ्यांना पाण्याचा योग्य व सुरळीत लाभ मिळावा,यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी दिल्या.
या पाहणी दौऱ्या दरम्यान जिल्हा परिषद सदस्य अजितदादा तळेकर,पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब बिचितकर,साडे गावचे सरपंच अण्णा आडेकर,योगेश लोंढे,वरकटणे गावचे सरपंच गणेश घोरपडे,संजय तनपुरे, कोकाटे उपसरपंच यांच्यासह अनेक सहकारी व शेतकरी उपस्थित होते.
दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या पाण्याच्या आवर्तनावर आमदार नारायण आबा पाटील यांचे बारकाईने लक्ष असून, शेतकऱ्यांना पाणी मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ते ‘अलर्ट मोड’वर असल्याचे या पाहणी दौऱ्यातून स्पष्ट झाले आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा