Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२६

ठकवणुक करणारा सराईत आरोपी जेरबंद. आरोपीकडून पी.व्ही.सी पॅनल पटटीचा रु. ५,५४,२५८/- चा माल, गुन्हा करणेकामी वापरलेला, रु. १५,००,०००/- किंमतीचा आयशर ट्रक, रु. ६५,०००/- किंमतीचे दोन मोबाईल फोन, असा एकुण रु. २१,१९,२५८/- रु. किंमतीचा मुददेमाल हस्तगत. एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.

 *मुख्यसंपादक* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*



ठकवणुक करणारा सराईत आरोपी जेरबंद.आरोपीकडून पी.व्ही.सी पॅनल पटटीचा रु. ५,५४,२५८/- चा माल, गुन्हा करणेकामी वापरलेला, रु. १५,००,०००/- किंमतीचा आयशर ट्रक, रु. ६५,०००/- किंमतीचे दोन मोबाईल फोन, असा एकुण रु. २१,१९,२५८/- रु. किंमतीचा मुददेमाल हस्तगत. एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाची दमदार कामगिरी. केली आहे



फिर्यादी परवेज फेजअहमद मोहोळकर वय-३५ वर्षे, व्यवसाय ट्रान्सपोर्ट, रा. ३१६, बी, जुने विडी घरकुल, हैद्राबाद रोड, सोलापूर यांचा नर्मदा कॉम्प्लेक्स या खान चाचा हॉटेल हैद्राबाद रोड सोलापूर जवळील बिल्डींगमध्ये न्यू इंडिया ट्रान्सपोर्ट नावाचा माल वाहतुकीचा व्यवसाय आहे. दि. ३१/०७/२०२६ रोजी ११:०० वा. ते सायंकाळी ०६:३० वा.चे दरम्यान आयशर ट्रक क्रमांक MH-१५-JC-९७९२ चा चालक मो.नं. ७७५८९५८३०२ याने वाहतुकीसाठी भाडे पाहिजे असे सांगुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला व ट्रान्सपोर्टकडून विश्वासाने रु. १०,०००/- मालवाहतुकीचे भाडे ठरवुन घेवून, उमर ट्रेडर्स, सुनिल नगर एम. आय.डी.सी सोलापूर येवून, त्यांचा पी.व्ही.सी पॅनल पटटीचा रु. ५,५४,२५८/- किंमतीचा माल, फिर्यादी यांचेकडून विश्वासाने घेवून, तो माल गोल्डन एंटरप्रायजेस, विजयपुरा कर्नाटक यांचेकडे न पोहचविता, फिर्यादी व उमर ट्रेडर्सचे मालक यांची फसवणुक केली, वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरुन आयशर ट्रक क्रमांक MH-१५-JC-९७९२ चा अनोळखी चालक याचेविरुध्द एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हा रजि नं. ७२८/२०२६ भा.न्या.सं. ३१८ (४), ३१६(३) वगैरे कलमान्वये दि. ०३/०८/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



पोलीस ठाणे हददीत दिवसा ठकवणुकीचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडल्याने, मा. पोलीस आयुक्त साो, सोलापूर शहर श्री. एम. राजकुमार, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्रीमती. अश्विनी पाटील मॅडम, पोलीस उप आयुक्त परिमंडळ, श्री. प्रितम यावलकर साहेब सहा. पोलीस आयुक्त विभाग-१ सोलापूर शहर श्री. अरुण देवकर साो, यांनी पो.स्टे कडील अधिकारी व अंमलदार यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन केले. वपोनि एम.आय.डी.सी पो.स्टे सोलापूर शहर श्री. भाऊराव बिराजदार साहेब, पो.नि. गुन्हे श्रीमती. संगिता पाटील, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक श्री. अल्फाज शेख व त्यांचे पथकातील अंमलदार, यांनी गुन्हयाचे घटनास्थळास भेट दिली. घटनास्थळाचे परिसरात मिळालेले सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी केली व गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळविण्याचे काम तात्काळ सुरु केले होते.

दि. २१/०८/२०२६ रोजी इसम नामे प्रतिक निंबाळकर रा. गोपाळवाडी, दौंड जि. पुणे हा फसवणुक करणारा सराईत गुन्हेगार असून, तो एम. एच. १५ जे. सी. १७९२ हे वाहन घेवून, भाडे मिळविण्याच्या उददेशाने सोलापूरात आलेला आहे व सध्या तो अक्कलकोट रोडवरील बी.एस.एन.एल टॉवर जवळील सव्हींस रोडवर त्याचेकडील आयशर ट्रक घेवून थांबलेला आहे. अशी बातमी मिळाली. गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने, पोलीस उप निरीक्षक अल्फाज शेख व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार यांनी अक्कलकोट रोडवरील बी. एस.एन.एल टांवर जवळील सव्हीस रोडवरुन आयशर ट्रक क्रमांक एम. एच. १५ जे. सी. ९७९२ चा चालक प्रतिक दत्तात्रय निंबाळकर वय-२६ वर्षे, मुळ रा. गोपाळवाडी ता. दौंड जि.पुणे सध्या रा. स्प्रिंग व्हिलेज अपार्टमेंट, ब्लॉक नं. ३०३, खोमणे यांचे घरी भाडयाने प्रगतीनगर, बारामती जि. पुणे यास ताब्यात घेवून कौशल्यापूर्ण तपास केला असता, त्याने दि. ३१/०७/२०२६ रोजी साथीदार नामे पंकज पारधे रा. बारामती, याचेसह सोलापूरात येवून, एम.आय.डी.सी सोलापूर येथून ट्रान्सपोर्टकडून माल वाहतूकीचे भाडे मिळवून, पी.व्ही.सी पॅनलचा रु. ५,५४,२५८/- किमतीचा माल, त्यांचेकडील आयशर ट्रकमध्ये भरुन घेवून, तो माल विजयपूर कर्नाटक येथे न पोहचविता, त्या मालाची परस्पर विल्हेवाट लावल्याचे कबूल केले. त्यामुळे त्यास गृहयाचे तपासकामी अटक करण्यात आली. गुन्हयाचे तपासात आरोपीकडून त्याने ठकवणुक करुन नेलेला रु. ५,५४,२५८/-किंमतीचा पी.व्ही.सी पॅनल पटटीचा माल, माल वाहतुकीसाठी बनावट नंबरप्लेट लावून वापरलेला रु. १५,००,०००/- किमतीचा आयशर ट्रक, रु. ६५,०००/- किंमतीचे दोन मोबाईल फोन असा एकुण रु. २१,१९,२५८/- किमतीचा मुददेमाल तपासामध्ये हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरचा गुन्हा अत्यंत कौशल्याने तपास करुन गुन्हे प्रकटीकरण पथकाने उघडकीस आणला आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोह. १२७ राकेश पाटील, नेमणुक एम.आय.डी.सी पो.स्टे सोलापूर शहर हे करीत आहेत.


सदरची कारवाई श्री. एम. राजकुमार, मा. पोलीस आयुक्त सोलापूर शहर, श्री. प्रितम यावलकर साहेब, पोलीस उप आयुक्त परिमंडळ सोलापूर शहर, श्री. अरुण देवकर सहा. पोलीस आयुक्त विभाग-१ सोलापूर शहर, तसेच श्री. भाऊराव बिराजदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. आय.डी.सी पोलीस स्टेशन सोलापूर शहर, श्रीमती संगीता पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे एम.आय.डी.सी पो.स्टे सोलापूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख श्री. अल्फाज शेख, पोलीस उप निरीक्षक, तसेच पोलीस अंमलदार, राकेश पाटील, एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन भांगे, अय्याज बागलकोटे, अमोगसिध्द निबाळ, सुहास अर्जुन, अमर शिवशिगवाले, नागेशसिंह चव्हाण, कुमार बोल्ली, सकलेन मुकादम, अविनाश डिगोळे, अमोल खरटमल, सचिनकुमार लवटे, यांनी केली आहे.


 पोलीस निरीक्षक *

वरिष्ठ पोलीस निरीक्षक, (की. एस. बिराजदार) एम.आय.डी.सी पो.स्टे. सोलापूर शहर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा