Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२६

*चिकुंद्रा येथे नशाबंदी मंडळाचा उपक्रम* *व्यसनाला हद्दपार करण्याचा विद्यार्थ्यांचा निर्धार*

 *नळदुर्ग --प्रतिनिधी* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9730867448*


नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याच्या वतीने व्यसनाविरोधात प्रचार, प्रसार, प्रबोधन व जनजागृती करण्याच्या उपक्रमांतर्गत श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, चिकुंद्रा, ता. तुळजापूर येथे व्यसनमुक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारची व्यसने, त्यांचे दुष्परिणाम तसेच व्यसनापासून दूर राहण्याचे उपाय याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.



यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे धाराशिव जिल्हा समन्वयक मारुती बनसोडे हे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक मनोहर घोडके होते . प्रमुख उपस्थिती म्हणून सहशिक्षक भैरवनाथ कानडे व महादेव गरड उपस्थित होते. यावेळी व्यसनमुक्तीपर पोस्टर्सचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीविषयक प्रबोधनात्मक पोस्टर्स व माहितीपर साहित्याचे वाटप करण्यात आले.


प्रमुख मार्गदर्शक मारुती बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यसनामुळे आरोग्य, शिक्षण, कुटुंब आणि सामाजिक जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच सर्व प्रकारच्या व्यसनांना ठामपणे नकार देऊन निरोगी व ध्येयवादी जीवनाचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी “कुठल्याही प्रकारचे व्यसन करणार नाही, व्यसनाला प्रोत्साहन देणार नाही आणि आजीवन व्यसनमुक्त राहू,” असा सामूहिक संकल्प केला. विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथही देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव गरड व सूत्रसंचालन सहशिक्षक भैरवनाथ कानडे यांनी केले.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि व्यसनमुक्त जीवनाचा घेतलेला सामूहिक संकल्प यामुळे नशाबंदी मंडळाचा हा उपक्रम प्रभावी ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा