वेळापूर (ता.माळशिरस) येथील श्री बृहन्मठाचे मठाधिपती श्री.ष.ब्र.१०८ सद् गुरू सदाशिव शिवाचार्य महास्वामीजी यांच्या आदर्श कार्याबद्दल श्रीलंका येथे "द ग्लोबल अचीव्हर्स अवॉर्ड २०२६" आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माळशिरस तालुक्यातून सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे व त्यांचे कौतुक होत आहे.
श्री.ष.ब्र.१०८ सद् गुरू सदाशिव शिवाचार्य महास्वामी यांनी शिक्षण,समाजसेवा, धार्मिक,सांस्कृतिक आणि मानवतावादी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल पेगासस रीफ,कोलंबो (श्रीलंका) येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील "द ग्लोबल अचीव्हर्स अवॉर्ड 2026" चा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले.हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा २० सप्टेंबर २०२६ रोजी श्रीलंका देशात संपन्न झाला.
श्री.ष.ब्र.१०८ सद् गुरू सदाशिव शिवाचार्य महास्वामीजी यांचे प्रमुख कार्य धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात असले तरी समाजाचे आपण सेवक आहेत या भावनेतून त्यांनी व्यापक समाजसेवा करून आदर्श निर्माण केला आहे.समाजात पसरलेली व्यसनाधीनता,अंधश्रद्धा,पाखंडपणा व सामाजिक अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी जनजागृती करण्याचे कार्य ते करीत आहेत. मठाच्या माध्यमातून गुरुकुल चालवून संस्कारक्षम व मूल्याधिष्ठित शिक्षण देण्याचे कार्यही सुरू आहे.आर्थिकदृष्ट्या दुर्बल,गोरगरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी अनेक वर्षांपासून शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते तसेच फुटपाथवर व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या गरजू व्यक्तींना अन्न व वस्त्रदान, तसेच गरीब व गरजू कुटुंबातील विवाहांसाठी आर्थिक सहाय्य देण्याचे कार्यही त्यांच्या माध्यमातून सातत्याने केले जाते.धार्मिक कार्यासोबतच शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक आणि मानवतावादी क्षेत्रात त्यांनी केलेल्या बहुआयामी कार्याची दखल घेऊन त्यांना ‘द ग्लोबल अचीव्हर्स अवॉर्ड २०२६’ या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने श्रीलंका येथे सन्मानाने गौरव करण्यात आले.
रविवार, २७ सप्टेंबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
*वेळापूरचे श्री.ष.ब्र.१०८ सद्गुरू सदाशिव शिवाचार्य महास्वामी यांना "द ग्लोबल अचीव्हर्स अवॉर्ड २०२६" पुरस्काराने सन्मानित.* *श्रीलंका येथे आंतरराष्ट्रीय अवाॅर्ड पुरस्कार देवून गौरविण्यात आले*
*वेळापूरचे श्री.ष.ब्र.१०८ सद्गुरू सदाशिव शिवाचार्य महास्वामी यांना "द ग्लोबल अचीव्हर्स अवॉर्ड २०२६" पुरस्काराने सन्मानित.* *श्रीलंका येथे आंतरराष्ट्रीय अवाॅर्ड पुरस्कार देवून गौरविण्यात आले*
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा