Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ३० सप्टेंबर, २०२६

*टी जे महाविद्यालयात १०८ विद्यार्थ्यांना रोजगार महाकुंभ अंतर्गत नोकरी : संस्थेचे संचालक अजय सूर्यवंशी यांची माहिती*

पुणे, डॉ. संदेश शहा. टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
महाराष्ट्र शासन रोजगार महाकुंभ अंतर्गत खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयांमध्ये आयोजित रोजगार महाकुंभ मेळाव्यात ४०७ विद्यार्थ्यां पैकी १०८ विद्यार्थ्यांना नोकरीची नियुक्तीपत्र देण्यात आली. या भव्य रोजगार महाकुंभ मेळाव्यास टाटा मोटर्स, बजाज, मिड्रा ग्रुप, एस के युनिटिक, महिंद्रा, किर्लोस्कर, ॲक्सिस बँक, मुथूट फायनान्स, बालाजी ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड, कॉल फ्लेक्स, लाईट हाऊस आदी ३७ नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला. या मेळाव्यात ४०७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, पैकी १०८ विद्यार्थ्याना नोकरीची नियुक्तीपत्र ( अपॉइंटमेंट ऑर्डर ) देण्यात आली.
यावेळी संस्थेचे संचालक अजय सूर्यवंशी म्हणाले, टी जे महाविद्यालयांमध्ये पदवी ते पदव्युत्तर असे सर्व अभ्यासक्रम उपलब्ध असून विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी करून आपले भवितव्य कसे घडवू शकतो यासाठी महाविद्यालय नेहमीच अग्रेसर आहे. विद्यार्थी हे आमचे ब्रँड असून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी संस्था व संचालक मंडळ कटिबद्ध आहे.
या अभिनव उपक्रमाला संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी शुभेच्छा देत समाज उपयोगी उपक्रम सातत्याने राबवले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली. रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सचिव आनंद छाजेड म्हणाले, अलीकडच्या काळात महाविद्यालयाने सर्व स्तरावर उल्लेखनीय प्रगती केली असून प्रत्येक विद्यार्थ्याला रोजगार मिळावा हा संस्थेचा प्रमुख हेतू आहे. याप्रसंगी प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी महाविद्यालयातील आगामी उपक्रमांची माहिती दिली तर रोजगार मेळाव्याचे समन्वयक उपप्राचार्य प्राध्यापक राजेंद्र लेले यांनी आलेल्या सर्व कंपन्यांचे प्रतिनिधी यांचे आभार मानले. याप्रसंगी संस्थेचे संचालक ॲड. अजय सूर्यवंशी, रमेश अवस्थी, जे. डी नाईक, जॉब कनेक्टचे आर. एम. गायकवाड आणि आजी-माजी विद्यार्थी तथा सर्व महाविद्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा