Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २३ सप्टेंबर, २०२६

*दुष्काळी परिस्थितीची मुख्यमंत्री फडणवीसांकडून पाहणी*; *शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे प्रयत्न*

*करमाळा तालुका-- प्रतिनिधी* *आलिम. शेख* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. सोलापूर जिल्ह्यातही पावसाअभावी खरीप पिकांवर परिणाम झाला आहे.या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. जयकुमारजी गोरे साहेब यांच्यासह सोलापूर पश्चिम भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा. गणेश भाऊ चिवटे भाजप नेते प्रतापराव जगताप, तसेच अनेक प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या अडचणी, पिकांचे नुकसान आणि पाणीटंचाईची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात शासन त्यांच्या पाठीशी असून, नुकसानीचे पंचनामे व आवश्यक मदतीबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा