लोहारा-- प्रतिनिधी*
*यशवंत भुसारे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
३० सप्टेंबर १९९३... महाराष्ट्राच्या इतिहासातील काळीज पिळवटून टाकणारी ती काळरात्र. सास्तूर, किल्लारीसह परिसराला पहाटेच्या सुमारास भूकंपाचा जबर धक्का बसला आणि क्षणार्धात अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. अनेक निरपराध नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अनेक जण कायमचे अपंग झाले, तर असंख्य महिलांच्या कपाळावरील कुंकू पुसले गेले. त्या भूकंपाने केवळ घरेच जमीनदोस्त केली नाहीत, तर अनेक कुटुंबांची स्वप्ने आणि आयुष्यभराच्या आठवणीही ढिगाऱ्याखाली गाडल्या. कुणी आई-वडील गमावले, कुणी लेकरं, तर कुणी आयुष्याचा जोडीदार. आजही त्या काळरात्रीच्या आठवणी जाग्या झाल्या की, भूकंपग्रस्तांच्या डोळ्यांसमोर तो विध्वंस उभा राहतो.
३० सप्टेंबर २०२६ रोजी या भीषण आपत्तीला ३३ वर्षे पूर्ण होत आहेत. तीन दशके उलटून गेली, पिढ्या बदलल्या; मात्र त्या भूकंपाच्या जखमा आणि काळजावर कोरलेल्या आठवणी आजही तितक्याच जिवंत आहेत. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणीला सास्तुर चौरस्ता व किल्लारी येथे दरवर्षी ३० सप्टेंबरला भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाते. हा दिवस केवळ स्मरणाचा नाही, तर निसर्गाच्या शक्तीसमोर माणूस किती क्षणभंगुर आहे आणि आपत्तीच्या वेळी सज्जता किती महत्त्वाची आहे, याची जाणीव करून देणारा आठवणीतील दिवस आहे.
सास्तूर-किल्लारीच्या मातीत आजही त्या काळरात्रीच्या वेदनांचा इतिहास दडलेला आहे. भूकंप गेला, काळ पुढे सरकला; पण त्या भूकंपाने दिलेला दुःखाचा ठसा मात्र पुसला गेलेला नाही.
आज ही या भागात सतत आजही भुकंपाची अधुन मधुन धक्के बसतात येथील नागरिकांना जिवंतपणी मरण यातना भोगाव्या लागतात हि वस्तुस्थिती खरी आहे. ३० सप्टेंबर १९९३ साली काळरात्र ठरली ३० सप्टेंबरच्या बुधवारी रात्री गणरायाचे भक्तिभावाने विसर्जन करून धरणी मायेच्या कुशीत गाड झोपेत असताना पहाटे पाच वाजून ५६ मिनिटांनी जमिनीतून रेल्वे जात असल्याचा मोठा आवाज सुरु झाला एका क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले झोपत असलेल्या माणसं कायमची जमिनीत गाडली गेली भूकंपाच्या तीव्र धक्क्याने आईचे स्तनपान करणाऱ्या चिमुकल्यांना सुद्धा भुकंपाने सोडले नाही,
या भुकंपाला ३० सप्टेंबर २०२६ रोजी ३३ वर्षे पूर्ण होत असून भूकंपग्रस्त गावे आज ही ओसाड असून भूकंपग्रस्त ५२ गावातील अनेक समस्या आज ही कायम आहेत भूकंपाच्या ३३ वर्षानंतर ही भूकंपग्रस्त भागात भूकंपाची भीती मात्र आजही कायम असून सागा आम्ही काय करावे.
मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
*मराठवाड्यात सास्तूर-किल्लारी भुकंपाला ३३ वर्षे पूर्ण झाली तरीही भीती आजही कायम आहे*
*मराठवाड्यात सास्तूर-किल्लारी भुकंपाला ३३ वर्षे पूर्ण झाली तरीही भीती आजही कायम आहे*
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा