Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२६

*महाराष्ट्रातील टॉप टेन गटामध्ये कसगी या.उमरगा श्री रेवणसिद्धेश्वर शेतकरी गटाच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक*

*मुख्य संपादक* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-9730867448*
*कसगी (ता. उमरगा) -* यंदा अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने उमरगा परिसरातील अनेकांची पिके करपून गेली असताना, कसगी येथील *श्री रेवणसिद्धेश्वर शेतकरी गटाने (आत्मा नोंदणी क्र. 397/542)* मात्र जिद्द सोडली नाही. सत्यमेव जयते फार्मर कप 2026 मध्ये सहभाग घेत या गटाने कमी खर्चात शेतीचा नवा आदर्श संपूर्ण परिसरासमोर ठेवला आहे.
गटातील शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर केला. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध होते, त्यांनी पाणी नसणाऱ्या शेतकऱ्यांना मदत केली. पाण्याची देवाण-घेवाण करत त्यांनी आपली पिके तर जोमाने उभी केलीच, पण खर्चातही विक्रमी बचत केली. या हंगामात गटाने एकूण चार फवारण्या केल्या. विशेष बाब म्हणजे या चारही फवारण्या सर्वांनी एकत्रित घेतल्या. त्यामध्ये *दशपर्णी अर्क व निंबोळी अर्काचा* वापर केल्याने कीटकनाशकावरील खर्च *शून्य* करण्यात गटाला यश आले. त्याचबरोबर दोन वेळा सामूहिक कोळपणी केल्याने आंतरमशागतीचा खर्चही शून्य झाला. रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय पद्धतीने शेती केल्याने खतावरील खर्चही वाचला. अशा प्रकारे एकत्रित प्रयत्नातून या गटाने *लाखो रुपयांची बचत* केली आहे.
आज या गटाच्या शेतात पीक डोलत असताना परिसरातील इतर गावातील शेतकरी फोन करून, प्रत्यक्ष भेट देऊन या मॉडेलची माहिती घेत आहेत. अनेकांनी पुढील वर्षी असाच गट स्थापन करून खर्च कमी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दुष्काळी परिस्थितीतही एकजुटीच्या जोरावर शेती कशी फायदेशीर करता येते, याचे जिवंत उदाहरण कसगीच्या या गटाने घालून दिले असून, सर्व स्तरातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा