Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २७ सप्टेंबर, २०२६

*तामलवाडी दलित वस्ती (भीम नगर) चा पाणी प्रश्न सुटला ; २८ सप्टेंबरचा घागर मोर्चा स्थगित - माजी सैनिक शिवाजी सावंत यांची माहिती*

*मुख्य संपादक* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-9730867448*
*तामलवाडी (ता. तुळजापूर) दि. २७ -* तामलवाडी येथील दलित वस्ती / भीम नगर येथील गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेला नळ पाणीपुरवठा ग्रामपंचायत प्रशासनाने अखेर सुरळीत केला आहे. यामुळे दि. २८ सप्टेंबर रोजी काढण्यात येणारा घागर मोर्चा स्थगित करण्यात आल्याची माहिती *आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी सैनिक सावंत शिवाजी रामकृष्ण व धम्मपाल रणसुरे* यांनी दिली. मागील आठवड्यात दलित वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. याबाबत दि. २४/०९/२०२६ रोजी सावंत यांनी ग्रामपंचायत प्रशासनास निवेदन देऊन पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास दि. २८ सप्टेंबर रोजी महिला व पुरुषांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता.
या निवेदनाची तत्काळ दखल घेत. ग्रामपंचायत अधिकारी श्री चैतन्य गोरे व प्रशासक* यांनी दि. २७/०९/२०२६ रोजी (जा.क्र. ४७/२०२६) लेखी पत्र देऊन कळवले की, भीम नगर येथील पाणीपुरवठा सुरळीत केला असून घागर मोर्चा स्थगित करण्यात यावा ही विनंती केली आहे. याबाबत प्रत्यक्षात कामाची खात्री केली असता ग्रामपंचायतीने - *१)* पाण्याच्या टाकीस नवीन मोटर बसवली, *२)* संपूर्ण विद्युत वायरिंग व स्टार्टर दुरुस्ती केली, *३)* जेसीबीच्या सहाय्याने मुख्य पाईपलाईनची खोदाई करून नवीन पाईपलाईन टाकली.
आपल्या विनंतीचा मान राखून व मुदतीत काम पूर्ण केल्याबद्दल श्री सावंत शिवाजी रामकृष्ण यांनी ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक व प्रशासनाचे आभार मानले असून, प्रशासनास सहकार्य करण्याच्या भावनेतून घागर मोर्चा स्थगित करत असल्याचे सांगितले. यावेळी धम्मपाल रणसुरे यांच्यासह वस्तीतील महिला व नागरिक उपस्थित होते. पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने भीम नगरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
____________________##____________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा