*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांनी गावभेट दौऱ्याअंतर्गत अर्धनारी व जामगाव (बु.) येथे भेट देऊन ग्रामस्थ, शेतकरी व नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या आणि विकासाच्या मागण्या जाणून घेतल्या.
अर्धनारी येथे खासदार प्रणितीताई शिंदे यांनी नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी जिमची सुविधा, रस्ते दुरुस्ती, स्ट्रीट लाईट, नवीन डी.पी. (विद्युत ट्रान्सफॉर्मर), घरकुल यांसह विविध मूलभूत सुविधांच्या मागण्या मांडल्या. गावाच्या विकासाशी संबंधित प्रत्येक मागणीची सकारात्मक दखल घेत आवश्यक त्या पातळीवर पाठपुरावा करण्याची ग्वाही खासदार प्रणितीताई शिंदे यांनी दिली.
यावेळी खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते हॉलीबॉल मैदानाचे उद्घाटन करण्यात आले. गावातील युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना आवश्यक क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या या मैदानामुळे युवकांना खेळासाठी चांगली सुविधा मिळणार आहे.
यानंतर जामगाव (बु.) येथेही खासदार प्रणितीताई शिंदे यांनी ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी चारा डेपो सुरू करण्याची, गावजोड रस्त्यांची कामे करण्याची तसेच सोलापूर ते वटवटे एसटी बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली.
गावभेटीदरम्यान नागरिकांनी मांडलेल्या समस्या आणि मागण्यांबाबत खासदार प्रणितीताई शिंदे यांनी संबंधित विभागांकडे आवश्यक पाठपुरावा करून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. गावातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि युवकांसाठी आवश्यक सुविधा यांना प्राधान्य देऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या गावभेट दौऱ्याला मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार, सरपंच पांडुरंग पवार, माजी सरपंच बाळासाहेब पवार, सौ. रूपाली सचिन पाटील, प्रशांत पाटील, बाळासाहेब पाटील, दत्तात्रय मेटकरी, सिद्धेश्वर पाटील, कुबेर गायकवाड, समाधान डांगे, चंद्रकांत सुरवसे, महादेव पाटील, अमित पवार, महेश पवार, वैभव कुचेकर, संतोष सोनवणे, प्रदीप शिवशरण, रोहित यादव, प्रकाश पाटील, हिरालाल तांबोळी, शंकर पाटील, गुंडोपंत जाधव यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रविवार, २७ सप्टेंबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
खासदार प्रणितीताई शिंदे यांचा अर्धनारी, जामगाव (बु.) गावभेट दौरा; नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासकामांसाठी पाठपुराव्याची ग्वाही*
खासदार प्रणितीताई शिंदे यांचा अर्धनारी, जामगाव (बु.) गावभेट दौरा; नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासकामांसाठी पाठपुराव्याची ग्वाही*
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा