*लोहारा -प्रतिनिधी*
*यशवंत भुसारे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
श्राद्ध पक्ष अर्थात पितरांचा पंधरवडा सुरू झाला की, आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा दिला जातो. पितरांच्या नावाने श्राद्ध केले जाते, कावळ्याला घास दिला जातो, दानधर्म केला जातो. मात्र या सर्व धार्मिक परंपरांमागील खरा संदेश आपण समजून घेतो का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, वाढवले, आपल्या सुखासाठी आयुष्यभर कष्ट केले, त्या आई-वडिलांना त्यांच्या हयातीत दोन प्रेमाचे शब्द देता येत नसतील, तर त्यांच्या मृत्यूनंतर कितीही मोठे श्राद्ध केले तरी त्यांच्या मायेची उणीव कधीच भरून निघणार नाही. आज अनेक घरांमध्ये वृद्ध आई-वडील जिवंत असूनही उपेक्षित जीवन जगताना दिसतात. त्यांच्या गरजा मोठ्या नसतात; त्यांना अपेक्षा असते ती केवळ आपुलकीची, दोन प्रेमाच्या शब्दांची आणि आपल्या माणसांनी जवळ बसून विचारपूस करण्याची. मात्र धावपळीच्या जीवनात आपण त्यांच्यासाठी वेळ काढत नाही.
आणि जेव्हा ते कायमचे निघून जातात, तेव्हा त्यांच्या आठवणीने डोळे पाणावतात. श्राद्धाच्या दिवशी कावळ्याला घास दिला जातो, विविध विधी केले जातात. पण ज्याला आपण आज प्रेमाचा घास देऊ शकलो नाही, त्याला उद्या कावळ्याला घास देऊन परत आणता येणार नाही.श्राद्ध पक्ष हा केवळ मृत व्यक्तींचे स्मरण करण्याचा काळ नसून, जिवंत नात्यांची किंमत ओळखण्याची संधी आहे. घरातील वृद्ध आई-वडील, आजी-आजोबा यांना वेळ द्या. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणा. त्यांच्या हातात हात द्या. त्यांची विचारपूस करा. कारण माणूस गेल्यानंतर उरतात त्या केवळ आठवणी; माणूस मात्र परत कधीच येत नाही.
म्हणून पितरांच्या नावाने श्राद्ध करण्यापेक्षा, जिवंत असलेल्या आपल्या माणसांची मनापासून सेवा करा. त्यांच्या हयातीत नाती जपा; कारण मृत्यूनंतर कावळ्याला घास घालून पश्चात्ताप करण्यापेक्षा, जिवंतपणी प्रेमाचा एक घास देणे अधिक मोलाचे आहे.
बुधवार, ३० सप्टेंबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
नाती जिवंतपणी जपा;नंतर कावळ्याला घास घालून काय उपयोग! श्राद्ध पक्ष(पितर) पंधरवडा
नाती जिवंतपणी जपा;नंतर कावळ्याला घास घालून काय उपयोग! श्राद्ध पक्ष(पितर) पंधरवडा
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा