Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १६ सप्टेंबर, २०२६

दिव्यांगाचे ५% थकीत निधी देण्याचे लेखी खोटे आश्वासन दिल्यामुळे १९ सप्टेंबर २०२६ रोजी माजी सैनिक सावंत शिवाजी रामकृष्ण यांचा दुसऱ्यांदा उपोषणाच्या आंदोलनाचा इशारा*

*मुख्य संपादक* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-9730867448*
तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी येथील ग्रामपंचायतीला आपल्या स्व-उत्पन्नातून ५ टक्के निधी दिव्यांग (अपंग) कल्याणकारी योजनांवर खर्च करणे बंधनकारक आहे. हा नियम केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मधील तरतुदीनुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार लागू आहे जो निधी ग्रामपंचायत कार्यालय तामलवाडी यांनी मागील दोन वर्षापासून दिव्यांग बांधव व भगिनीकरिता खर्च केलेला नसून तो १५ ऑगस्ट २०२६ पूर्वी देण्याकरिता उपोषण आंदोलनाचा इशारा देऊनही न दिल्यामुळे दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तामलवाडी चे संस्थापक अध्यक्ष तथा माजी सैनिक सावंत शिवाजी रामकृष्ण यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण आंदोलन केले होते त्याद्वारान प्रशासक सौ नूरबानू सिकंदर बेगडे व ग्रामपंचायत अधिकारी श्री चैतन्य गोरे यांनी ०७ (सात) दिवसात सन २०२४-२५ व २०२५-२६ चा ५% दिव्यांग निधी वरिष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शन घेऊन वाटप करून संपूर्ण माहिती आपणास उपलब्ध करून देण्यात येईल असे लेखी आश्वासन देऊनही त्याप्रमाणे कारवाई न झाल्यामुळे श्री सावंत यांनी दुसऱ्यांदा एका लेखी निवेदनाद्वारे दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालय तामलवाडी समोर उपोषण करण्याचा इशारा मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर व ग्रामपंचायत कार्यालय तामलवाडी यांना दिलेला आहे त्यामुळे तामलवाडी मधील दिव्यांग बांधवांना त्यांचा निधी मिळण्याच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा