इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी
सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९
शहाजीनगर ( ता. इंदापूर ) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्ली यांचा गाळप हंगाम सन २०२५ -२६ साठीचा राष्ट्रीय पातळीवरील तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी शुक्रवार दि. ११ सप्टेंबर रोजी दिली. या पुरस्कारा बद्दल कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
नीरा-भीमा कारखान्यास सदर गळीत हंगामामध्ये सर्वच उत्कृष्ट तांत्रिक निकषपूर्तीमुळे हा राष्ट्रीय कार्यक्षमतेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कारखान्याचा सन २०२५-२६ चा गळीत हंगाम हा रौप्यमहोत्सवी गळीत हंगाम होता. या रौप्यमहोत्सवी गळीत हंगामामध्येच देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार मिळाल्याने, कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे सौ. भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांनी संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूकदार, अधिकारी, कर्मचारी व हितचिंतकांचे अभिनंदन केले आहे. पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार दि. २२ सप्टेंबर रोजी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे संपन्न होणार आहे. कारखान्यास आजपर्यंत राज्य व देशपातळीवरील एकूण १३ पुरस्कार मिळाले असून सभासदांच्या आर्थिक हितासाठी कटिबद्ध असल्याची माहिती यावेळी अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी दिली.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, ॲड कृष्णाजी यादव, शिवाजी हांगे, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे, कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ उपस्थित होते.
फोटो- नीरा भीमा कारखाना, हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील.
सोमवार, १४ सप्टेंबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
नीरा भीमा कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरील तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार, अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांची माहिती. दिल्ली येथे २२ सप्टेंबरला होणार पुरस्कार वितरण. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेकडून अभिनंदन.
नीरा भीमा कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरील तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार, अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांची माहिती. दिल्ली येथे २२ सप्टेंबरला होणार पुरस्कार वितरण. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेकडून अभिनंदन.
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा