Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २१ सप्टेंबर, २०२६

*तुळजापूर येथील आदर्श सारा गौरव सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाने वर्गणी व मिरवणुकीचा खर्च टाळून केले आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ व स्कूल बॅग चे वाटप*

*तुळजापूर-- प्रतिनिधी* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *9730867448*
तुळजापूर : महाराष्ट्रावर यंदा दुष्काळाचे सावट असताना उत्सवाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श सारा गौरव सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ, तुळजापूर यांनी घालून दिला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले; मात्र दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गणपतीची साध्या पद्धतीने स्थापना करत वर्गणीमुक्त व बिगर मिरवणुकीचा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मोठ्या मिरवणुका, सजावट व इतर अनावश्यक खर्चाला फाटा देत त्यातून वाचणारा निधी सामाजिक कार्यासाठी वापरण्याचा निर्णय मंडळाने घेतला. याच भावनेतून जय तुळजामाता आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटप तसेच स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. उत्सवाच्या माध्यमातून आनंद साजरा करण्याबरोबरच गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा प्रयत्न मंडळाने केला. स्कूल बॅगचे हे वाटप कै. सागर बाळासाहेब चिखलकर यांच्या स्मरणार्थ करण्यात आले. त्यांच्या स्मृती जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला हातभार लावण्याचा हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. सामाजिक कार्यातून एखाद्याच्या शिक्षणाला बळ मिळू शकते, हा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला. स्कूल बॅग वाटपाचा कार्यक्रम तुळजापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप करण्यात आले. गणेशोत्सवाचा खर्च कमी करून तो सामाजिक उपक्रमासाठी वापरणाऱ्या सारा गौरव मंडळाच्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देणारा उत्सव ठरावा, या उद्देशाने मंडळाने घेतलेला हा निर्णय विशेष ठरला. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणींचा सामना करत असताना उत्सवातील खर्चाला सामाजिक कार्याची दिशा देणे ही निश्चितच सकारात्मक बाब ठरली आहे. यावेळी सारा गौरव सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व मित्रपरिवार उपस्थित होते. ‘उत्सव साधेपणाने साजरा करा, पण सामाजिक बांधिलकी मनापासून जपा’ असा प्रेरणादायी संदेश देणारा सारा गौरव मंडळाचा हा उपक्रम तुळजापूरमध्ये चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा