*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
नीरा नरसिंहपूर,ता.१८-: ज्येष्ठा व कनिष्ठा गौराईच्या सणानिमित्त पिंपरी बुद्रुक येथील प्रगतिशील शेतकरी प्राजक्ता व केशव बोडके यांनी शेतीशी संबंधित विविध घटकांचा कल्पक वापर करून ‘कृषी समृद्धी’ या संकल्पनेवर आधारित प्रबोधनात्मक देखावा साकारला आहे. पारंपरिक सणाच्या माध्यमातून शेतीचे महत्त्व, शेतकऱ्यांचे कष्ट आणि कृषी संस्कृतीची समृद्ध परंपरा अधोरेखित करण्याचा प्रयत्न या देखाव्यातून करण्यात आला आहे.
गौराईच्या सजावटीमध्ये शेतात पिकविलेली विविध धान्ये, कडधान्ये, फळे, भाजीपाला तसेच शेतीशी निगडित विविध साहित्याचा कलात्मक पद्धतीने वापर करण्यात आला आहे. ग्रामीण जीवनाचा केंद्रबिंदू असलेली शेती आणि तिच्यावर अवलंबून असणारी अर्थव्यवस्था याचे प्रभावी चित्रण या देखाव्यात करण्यात आले आहे.
‘अन्नदाता शेतकरी’, ‘शेती वाचवा, शेतीसंस्कृती जपा’, ‘कृषी समृद्ध तर गाव समृद्ध’ अशा प्रबोधनात्मक संदेशांतून शेतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. पारंपरिक गौराई उत्सवाला सामाजिक व कृषी प्रबोधनाची जोड देत साकारलेला हा देखावा परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
शेतीमध्ये राबणाऱ्या शेतकरी कुटुंबाचे कष्ट, निसर्गाशी असलेले नाते आणि शेतातून निर्माण होणारी समृद्धी याचे दर्शन या सजावटीतून घडत आहे. सण-उत्सवाच्या माध्यमातून नव्या पिढीला शेती आणि ग्रामीण संस्कृतीची ओळख व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे प्राजक्ता व केशव बोडके दाम्पत्याने सांगितले.
चौकट - राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सुविद्य पत्नी सारिका मामी भरणे यांनी या ठिकाणी भेट देऊन प्राजक्ता व केशव बोडके या शेतकरी दांपत्याचे कौतुक करत गौराईतून कृषी समृद्धीची वेगळी कल्पना मांडल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना व्हिडिओ कॉलद्वारे सदरचा देखावा दाखवल्यानंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्राजक्ता व केशव बोडके यांचे कौतुक करत अभिनंदन केले. यावेळी गजराबाई व शिवाजी बोडके हे शेतकरी दांपत्ये उपस्थित होते.
फोटो :पिंपरी बुद्रुक येथे ज्येष्ठा व कनिष्ठा गौराईनिमित्त प्रगतिशील शेतकरी प्राजक्ता व केशव बोडके यांनी साकारलेला कृषी समृद्धीचा प्रबोधनात्मक देखावा.
------------------------------------------------------------------------
शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
*पिंपरी बुद्रुक येथील केशव बोडके यांनी साकारलेला कृषी समृद्धीचा प्रबोधनात्मक देखावा.व शेती संस्कृतीचे प्रबोधनात्मक दर्शन*
*पिंपरी बुद्रुक येथील केशव बोडके यांनी साकारलेला कृषी समृद्धीचा प्रबोधनात्मक देखावा.व शेती संस्कृतीचे प्रबोधनात्मक दर्शन*
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा