Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १६ सप्टेंबर, २०२६

*भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा वैद्यकीय आघाडीच्या जिल्हा सरचिटणीसपदी डॉ. पृथ्वीराज काळे.* ​अकलूजचे डाॅक्टर सुपुत्राची सांगली जिल्हा भाजपाच्या वैद्यकीय आघाडी सरचिटणीस पदी निवड.

*अकलूज प्रतिनिधी* *केदार लोहकरे* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
सांगलीच्या भारतीय जनता पार्टी जिल्हा वैद्यकीय आघाडीच्या जिल्हा सरचिटणीसपदी डॉ. पृथ्वीराज मोहन काळे यांची निवड करण्यात आली.ही निवड महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व सांगली जिल्हाचे पालकमंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार सुधीर (दादा) गाडगीळ, मकरंदभाऊ देशपांडे,सांगली जिल्हाध्यक्ष प्रकाशमामा ढंग, स्थायी समितीचे सभापती अतुल माने, पृथ्वीराज बाबा पाटील, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.पवन दोरकर आणि रावसाहेब पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ​डाॅ. पृथ्वीराज मोहनराव काळे यांचे सांगली येथील वैद्यकीय क्षेत्रातील कार्य बघून भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा वैद्यकीय आघाडीच्या जिल्हा सरचिटणीसपदी निवड केली आहे.डाॅ.काळे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवल्याबद्दल जिल्हाध्यक्ष डॉ.पवन दोरकर यांनी पक्षाचे आभार मानले.​सांगली सारख्या नव्या शहरामध्ये जाऊन त्यांनी आपले नाव वैद्यकीय क्षेत्रात केले आहे आणि वर्चस्व निर्माण केले.सांगलीत जाऊन त्यांनी आपले स्वतःचे 'डॉ. काळे लाईफ केअर क्लिनिक' सुरू केले आणि आता ते सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या आयसीयू (ICU) मध्ये आपली सेवा देत आहेत.यापूर्वी ते सांगली विधानसभा वैद्यकीय आघाडीचे संयोजक म्हणून काम करत होते. अकलूजकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की,अकलूजमधून बाहेर जाऊन त्यांनी आपले नाव कमावले आहे.​शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांची ही वाटचाल,तसेच आरोग्यसेवेतील त्यांचे अखंडित योगदान सांगली जिल्ह्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.त्यांच्या यानिवडीबद्दल सांगली व अकलूज परिसरातील राजकीय, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. *चौकट* या नियुक्तीनंतर बोलताना डाॅ. पृथ्वीराज काळे म्हणाले की, पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे.त्याला तडा जाऊ देणार नाही.मिळालेल्या संधीचा उपयोग गोरगरीब,सर्वसामान्य लोकांना व वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना मदत करण्यासाठी आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी उपयोगात आणणार असून पक्षाने दिलेली जबाबदारी पुर्ण निष्ठेने पार पाडेन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा