इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेटफळ तलाव लाभक्षेत्रातील 10 गावांमध्ये चाऱ्याचा तसेच माणसांना व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे निरा डावा कालव्यातून तातडीने शेटफळ तलावात पाणी सोडण्यास सुरुवात करून लाभ क्षेत्रासाठी आवर्तन चालु करावे, अन्यथा बावडा येथे संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर शुक्रवारी (दि. 2) सकाळी 9 वा. रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा लाभ क्षेत्रातील 10 गावांतील शेतकरी व शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने इंदापूर तहसीलदारांना सोमवारी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
शेटफळ तलावातून लाभ क्षेत्रातील बावडा, शेटफळ, भोडणी, वकीलवस्ती, सुरवड, पिठेवाडी, निरनिमगाव, कचरवाडी (बा.), सराटी, लाखेवाडी या गावांसाठी गेली 4 महिन्यांपासून आवर्तन सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे या गावांमधील जनावरांच्या चाऱ्याचा व सुमारे 50 हजार लोकसंख्येला पिण्याचा पाण्याचा प्रश्न उग्र बनला आहे.
गेली 115 वर्षांपासून शेटफळ तलाव हा भाटघर धरणातील पाण्याने पावसाळ्यात भरून घेतला जात आहे. मात्र चालू पावसाळ्यात भाटघर वीर धरण 2 ते 3 वेळा ओव्हर फ्लो होऊन नीरा नदीला पाणी सोडून देण्यात आले, मात्र शेटफळ तलाव पाण्याने भरून घेण्यात आला नाही, त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. सदर अन्याय दूर करण्यासाठी शेटफळ तलाव तातडीने वीर-भाटघर धरणातील उपलब्ध पाण्याच्या टक्केवारी एवढा भरून द्यावा, अन्यथा शासनाला गावोगावी टँकर व चारा छावण्या सुरु कराव्या लागतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
जलसंपदा विभागाचे अधिकारी वारंवार तलाव भरून देण्याचे आश्वासन देत आहेत, मात्र कृती करीत नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक सुरु आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील 10 गावांमधील नागरिकांचा व लाखो जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी निरा डावा कालव्यातून तातडीने पाणी तलावात सोडण्यास सुरुवात करून लाभक्षेत्रासाठीआवर्तन चालु करावे, अशी अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खा. सुप्रिया सुळे, जिल्हाधिकारी पुणे, अधिक्षक अभियंता पुणे पाटबंधारे मंडळ पुणे, कार्यकारी अभियंता निरा डावा कालवा पुणे उपअभियंता उपविभाग निमगाव केतकी, पोलीस निरिक्षक इंदापूर व निरा नरसिंहपूर आदींना देण्यात आले आहे.
दरम्यान, तहसीलदारांना निवेदन देण्यापूर्वी या संदर्भात बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या सभागृहामध्ये 10 गावातील शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी प्रशांत पाटील, उदयसिंह पाटील, मनोज पाटील, दत्तात्रय घोगरे यांनी मार्गदर्शन केले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हेही शेटफळ तलावामध्ये पाणी सोडणे व आवर्तनासाठी आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रारंभी आप्पासाहेब जगदाळे हेही उपस्थित होते. आभार पवनराजे घोगरे यांनी मानले.
_________________________
फोटो:इंदापूर येथे तहसीलदार जीवन बनसोडे यांना शेटफळ तलाव प्रश्नी मागणीचे निवेदन देताना मान्यवर.
मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
शेटफळ तलावामध्ये पाणी सोडून आवर्तनाच्या मागणीसाठी बावडा येथे शुक्रवारी रास्ता रोको -तहसीलदारांना निवेदन -शेटफळचे लाभार्थी शेतकरी आक्रमक
शेटफळ तलावामध्ये पाणी सोडून आवर्तनाच्या मागणीसाठी बावडा येथे शुक्रवारी रास्ता रोको -तहसीलदारांना निवेदन -शेटफळचे लाभार्थी शेतकरी आक्रमक
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा