*अकलूज --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
उद्योगमहर्षी उदयसिंह शंकरराव मोहिते-पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्त शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित जिजामाता कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, अकलूज येथे प्रशाला स्तरावरील विज्ञान प्रदर्शनाचे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा, चिकित्सक विचार, प्रयोगशीलता आणि नवोपक्रमाची वृत्ती निर्माण व्हावी, या उद्देशाने या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या विज्ञान प्रदर्शनात सुमारे ४५० विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
विद्यार्थिनींनी आपल्या कल्पकतेला प्रयोग व विविध विज्ञान प्रतिकृतींच्या माध्यमातून मूर्त स्वरूप दिले. विज्ञानातील विविध संकल्पना सोप्या व आकर्षक पद्धतीने मांडत विद्यार्थिनींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विज्ञानाचा दैनंदिन जीवनाशी असलेला संबंध, पर्यावरण संवर्धन, ऊर्जा बचत, तंत्रज्ञान आणि समाजोपयोगी उपक्रम अशा विविध विषयांवर विद्यार्थिनींनी प्रकल्प सादर केले.प्रदर्शनाला पालकवर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थिनींच्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थिनींनी तयार केलेल्या विविध प्रकल्पांची माहिती पालक व उपस्थित मान्यवरांना आत्मविश्वासाने सांगितली. त्यामुळे विद्यार्थिनींच्या संवादकौशल्यासोबतच निरीक्षण, विश्लेषण व समस्या सोडविण्याच्या क्षमतेलाही चालना मिळाली.याप्रसंगी डॉ. प्रविण ढवळे प्राचार्य सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर शंकरनगर, स्थानिक प्रशाला व्यवस्थापन समितीच्या सदस्या सोनल माने देशमुख, विज्ञान अभ्यासक प्रताप तोरणे,उदय उरणे मुख्याध्यापिका सुनीता वाघ पर्यवेक्षक संतोष अनगळ शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विज्ञान प्रदर्शनाची पाहणी करून विद्यार्थिनींनी सादर केलेल्या प्रकल्पांचे कौतुक केले.यावेळी बोलताना विज्ञान अभ्यासक प्रताप तोरणे व उदय उरणे यांनी विद्यार्थिनींमध्ये लहान वयापासून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान न घेता प्रयोग, निरीक्षण आणि प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून विज्ञान समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जिजामाता कन्या प्रशालेची उभारणी करताना शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजने विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाचा व्यापक दृष्टिकोन ठेवला आहे. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विज्ञान, कला, क्रीडा, वक्तृत्व, तंत्रज्ञान आणि विविध सर्जनशील उपक्रमांना प्रोत्साहन देऊन विद्यार्थिनींच्या सुप्त गुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य प्रशालेत सातत्याने केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयोजित केलेले हे विज्ञान प्रदर्शन विद्यार्थिनींच्या कल्पकतेला आणि प्रयोगशीलतेला चालना देणारे ठरले.उद्योगमहर्षी उदयसिंह शंकरराव मोहिते-पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थिनींमध्ये ‘विज्ञान शिकण्यापेक्षा विज्ञान अनुभवण्याची’ भावना निर्माण झाली. विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हे विज्ञान प्रदर्शन संस्मरणीय ठरले. उद्योगमहर्षि उदयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या जीवनावरती प्रशालेतील सहशिक्षक ज्ञानेश्वर शेलार व विद्यार्थिनी आर्या देवकर, अल्फिया सय्यद यांनी विचार व्यक्त केले. प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागातील शिक्षक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.प्रास्ताविक दिपाली राजमाने तर सूत्रसंचालन शोभा खराडे यांनी केले
गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
*जिजामाता कन्या प्रशालेच्या उभारणीत शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचा व्यापक दृष्टिकोन* उद्योगमहर्षी उदयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जयंतीनिमित्त विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
*जिजामाता कन्या प्रशालेच्या उभारणीत शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचा व्यापक दृष्टिकोन* उद्योगमहर्षी उदयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जयंतीनिमित्त विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा