*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
:----- मौजे बावडा (ता. इंदापूर) येथे राज्य शासनाच्या नवीन DCS MH (Digital Crop Survey) प्रणालीमध्ये मध्यवर्ती सर्व्हर, विलेज मास्टर डेटा आणि जीआयएस नकाशा सिंक न झाल्याने ई-पीक पाहणीचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. शेजारील गावांमध्ये ही प्रक्रिया सुरू असताना बावडा गावातील हजारो शेतकरी केवळ प्रशासकीय व तांत्रिक बिघाडामुळे ई-पीक पाहणीपासून वंचित राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा किसान मोर्चाचे इंदापूर विधानसभा अध्यक्ष अभिजीत घोगरे यांनी राज्याचे महसूल मंत्री, जमाबंदी आयुक्त व पुणे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकृत निवेदन पाठवून सर्व्हर तातडीने दुरुस्त करण्याची आणि १५ दिवसांची विशेष मुदतवाढ देण्याची आग्रही मागणी केली आहे.
सध्या तालुक्यात पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, महसूल व दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार आगामी काळात मिळणारे दुष्काळी अनुदान, पीक विमा भरपाई आणि संस्थात्मक कर्ज सवलतींसाठी डिजिटल ७/१२ वरील ई-पीक पाहणीची नोंद हाच मूलभूत कायदेशीर पुरावा असतो. सर्व्हरवरील तांत्रिक त्रुटीमुळे येथील शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहू नयेत, यासाठी एनआयसी (NIC) व भूमी अभिलेख विभागाने युद्धपातळीवर प्रणाली पूर्ववत करावी आणि सर्व्हर सुरू झाल्यापासून १५ दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शनिवार, १९ सप्टेंबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
बावडा परिसरातील DCS MH ई-पीक पाहणी सर्व्हर तात्काळ दुरुस्त करा; दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर १५ दिवसांची मुदतवाढ द्या – भाजपा किसान मोर्चाची महसूल मंत्र्यांकडे मागणी
बावडा परिसरातील DCS MH ई-पीक पाहणी सर्व्हर तात्काळ दुरुस्त करा; दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर १५ दिवसांची मुदतवाढ द्या – भाजपा किसान मोर्चाची महसूल मंत्र्यांकडे मागणी
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा