Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १९ सप्टेंबर, २०२६

शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तुळजापूर येथे 21 सप्टेंबर रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन

*मुख्य संपादक* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-9730867448*
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तुळजापूर येथे 21 सप्टेंबर रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे पावसाळा चालू होऊन किमान चार महिने होत आले असून अद्याप वरून राजा बसला नाही आणि पावसाने दडी मारल्याने पिके जळाली हसून शेतकरी राजा संकटात सापडला आहे!सोयाबीन | उडीद | बाजरी | मका | द्राक्षबाग इत्यादी पिकांचे पावसाअभावी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे म्हणूनच शेतकऱ्यांच्या साठी न्याय्य मागण्यांसाठी… सोमवार, २१ सप्टेंबर २०२६ सकाळी ११.०० वाजता तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय, पर्यंत धाराशिव उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चा द्वारे काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रमुख मागण्या : तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करा हेक्टरी ₹१ लाख मदत द्या कर्जमाफी करून नवीन पीककर्ज द्या चालू पीककर्जाचे व्याज माफ करा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹१ लाख प्रोत्साहनपर अनुदान द्या पीक विम्याची तात्काळ भरपाई द्या जनावरांसाठी पाणी व चारा छावण्या सुरू करा रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करा विहिरी व बोअर अधिग्रहित करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती व मोफत एस.टी. पास द्या महिला शेतकरी बचत गटांच्या कर्जवसुलीस स्थगिती देऊन व्याज माफ करा इत्यादी मागण्या करण्यात येणार आहेत शेतकरी वाचला तरच शेती वाचेल! शेतकरी वाचला तरच गाव वाचेल! म्हणून शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शेतकरी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आयोजक- ॲड. धिरज आ. पाटील मा. अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी, धाराशिव. ॲड.अरविंद बेडगे अध्यक्ष-तालुका काँग्रेस कमिटी,तुळजापूर. श्री.अमोल कुतवळ कार्याध्यक्ष-तालुका काँग्रेस कमिटी,तुळजापूर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा