*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
*कसगी (ता. उमरगा) -* मागील वर्षी अतिवृष्टीने आणि यंदा भीषण दुष्काळाने होरपळलेल्या उमरगा-लोहारा तालुक्यातील बळीराजाला सावरण्यासाठी *ॲड. शीतल चव्हाण फाऊंडेशन, उमरगा* ने पुढाकार घेत *'बळीराजा आधार अभियान 2026-27'* चा शुभारंभ कसगी येथे मोठ्या उत्साहात केला.
यावर्षी पावसाअभावी सोयाबीन, तूर, मूग, उडीद यासह सर्वच पिके करपून गेली असून शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत. अशा संकट काळात केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष बांधावर जाऊन मदत करण्याची भूमिका फाऊंडेशनने घेतली आहे.
*फाऊंडेशनचा शेतकऱ्यांसाठी पंचसूत्री आधार -*
या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांच्या पाच प्रमुख गरजा लक्षात घेतल्या आहेत -
1. *पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता*
2. *रोजगार निर्मितीद्वारे आर्थिक आधार*
3. *पीक कर्ज व पीक विमा भरपाईसाठी शासन दरबारी ठोस पाठपुरावा*
4. *पुढील पेरणीसाठी बियाणे, खते व आर्थिक बळ*
5. *भविष्यातील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाय म्हणून जलसंधारण*
*जल हेच भविष्य - 25 जलताऱ्यांची निर्मिती*
भविष्यात पाणी पातळीत कायमस्वरूपी वाढ व्हावी या दूरदृष्टीतून फाऊंडेशनने *नाला सरळीकरण, खोलीकरण आणि वनराई बंधाऱ्यातील गाळ काढणे* या कामासाठी ग्रामपंचायत, कसगी यांना टोपले, कुदळ, फावडे यांसारख्या साहित्याची मदत केली आहे.
विशेष म्हणजे, गावात *25 जलताऱ्यांची निर्मिती* करण्याचा महत्वाकांक्षी संकल्प फाऊंडेशनने केला असून त्यातील *20 जलताऱ्यांची संपूर्ण निर्मिती फाऊंडेशन स्वखर्चातून* करणार आहे, तर *5 जलताऱ्यांची निर्मिती गावातील तरुणांच्या श्रमदानातून* होणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला असून संपूर्ण कसगी ग्रामस्थांनी या कार्याचे मनापासून अभिनंदन केले आहे.
*श्री रेवणसिद्धेश्वर शेतकरी गटाच्या कार्याचा आदर्श*
या प्रसंगी फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी *श्री रेवणसिद्धेश्वर शेतकरी गट, FC 2026, कसगी* या पुरस्कार प्राप्त गटाच्या शेतशिवाराला भेट देऊन पाहणी केली. 45 एकरवर केवळ श्रमदान आणि जैविक पद्धतीने फुलवलेली हिरवळ पाहून त्यांनी भरभरून कौतुक केले.
"दुष्काळातही असे पीक फुलवणे हे केवळ गटशेती आणि जिद्दीमुळेच शक्य आहे. या गटाला मिळालेला *'कृषिरत्न' पुरस्कार* हा विविध माध्यमे, कृषी विभाग आणि प्रत्यक्ष पाहणीतून घेतलेल्या माहितीच्या आधारे अत्यंत उचित आणि अभ्यासपूर्ण निर्णय आहे," असे गौरवोद्गार यावेळी फाऊंडेशनच्या वतीने काढण्यात आले.
*बांधावर जाऊन दिला धीर, भरले अर्ज*
केवळ पाहणी न करता, फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या, करपलेल्या पिकाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना धीर दिला. झालेल्या नुकसानीचे पंचनामे जलद व्हावेत आणि शासनाची मदत मिळावी यासाठी जागेवरच शेतकऱ्यांकडून *नुकसान भरपाईचे अर्ज व विम्याचे फॉर्म भरून घेऊन शासन दरबारी पाठपुरावा* करण्याचे आश्वासन देण्यात आले.
ॲड. शीतल चव्हाण फाऊंडेशनच्या या मोठ्या मनाच्या सहकार्यामुळे कसगीसह संपूर्ण उमरगा-लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये नव्या आशेचा किरण निर्माण झाला असून शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
*बळीराजा आधार अभियान 2026-27 : ॲड. शीतल चव्हाण फाऊंडेशनचा कसगीच्या शेतकऱ्यांना मोठा आधार ; 25 जलताऱ्यांच्या निर्मितीसह दुष्काळी संकटावर मात करण्याचा निर्धार*
*बळीराजा आधार अभियान 2026-27 : ॲड. शीतल चव्हाण फाऊंडेशनचा कसगीच्या शेतकऱ्यांना मोठा आधार ; 25 जलताऱ्यांच्या निर्मितीसह दुष्काळी संकटावर मात करण्याचा निर्धार*
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा