*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा तालुक्यातील कुंभेज येथील सुपुत्र युवा अभियंता बालाजी माने यांचा नुकताच मुंबई येथे उत्कृष्ट अभियंता म्हणून गौरव करण्यात आला
अभियंता दिनानिमित्त सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अभियंत्यांसह उत्कृष्ट प्रकल्पांचा गौरव करण्यात येतो. सन २०२४–२५ आणि २०२५–२६ या दोन वर्षांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभियंते व प्रकल्पांचा पुरस्कार सोहळा २९ सप्टेंबर २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे पार पडला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी तालुक्यातील कुंभेज येथील युवा अभियंता बालाजी माने यांचा उत्कृष्ट अभियंता म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला
सन २०२५–२६ साठी दौंड–सिद्धटेक–राशीन–कोर्टी–रामा ६८ या रस्त्याची महाराष्ट्रातील उत्कृष्ट रस्ता म्हणून निवड करण्यात आली. या रस्त्याचे काम राजपथ (पुणे) या अभिकरणामार्फत, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, कर्जत, जि. अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सार्वजनिक बांधकाम उपविभाग, कर्जत तसेच अहिल्यानगर येथील संबंधित अधिकारी व अभियंत्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
यामध्ये कुंभेजचे सुपुत्र तथा सार्वजनिक बांधकाम उपविभाग, कर्जत, जि. अहिल्यानगर येथे कार्यरत सहायक अभियंता बालाजी बबनराव माने यांचाही सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट रस्ता प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीत योगदान दिल्याबद्दल झालेला हा गौरव कुंभेजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ठरला आहे.
बालाजी माने यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ग्रामपंचायत कुंभेज, येथील दिगंबरराव बागल विद्यालय , जिल्हा परिषद शाळा तसेच युवक उत्सव मंडळे आणि परिसरातील शिक्षणप्रेमी नागरिक त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
कुंभेजचे सुपुत्र अभियंता बालाजी माने यांचा अभियंता दिना दिवशी झाला गौरव सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते मुंबई येथे झाला सन्मान
कुंभेजचे सुपुत्र अभियंता बालाजी माने यांचा अभियंता दिना दिवशी झाला गौरव सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते मुंबई येथे झाला सन्मान
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा