*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा पोलिसांनी वीट येथील गाडे यांच्या मालकीचा चोरीचा ट्रॅक्टर करमाळा पोलिसांना शोधण्याकामी मोठे यश आले असून करमाळा पोलिसांच्या या दमदार कामगिरीमुळे त्यांचे सर्व स्तरातून करमाळा पोलिसांचे विशेष अभिनंदन होत आहे
याबाबत हकिकत अशी कि, दि.२५/०९/२०२६ रोजी दुपारी १५/०० वा ते दि.२६/०९/२०२६ रोजी सकाळी ०६/०० वा चे दरम्यान फिर्यादी नामे विजयकुमार महादेव गाडे वय ६३ वर्षे, धंदा- शेती, रा. वीट, ता.करमाळा, जि.सोलापूर यांचे मालकीचे मौजे वीट हद्दीतील शेती गट नं. ८१३ मधील पत्राचे शेड येथे लावलेला १) ३,५०,०००/- रू किंमतीचा सोनालीका कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर आर.टी.ओ. रजिस्टर नं एम.एच. ४५ एफ ८०९९, चेसिस नं DZYSW259723/3, इंजिन नं 310E1131260490F3 असा असलेला २) २५,०००/- रू किंमतीचा पाळीचा मोगडा ट्रॅक्टरला जोडलेला असा एकुण ३,७५,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेला आहे. म्हणुन करमाळा पोलीस ठाणे गु.र.क ८५३/२०२६ भा.न्या.सं.क ३०३(२) प्रमाणे दाखल आहे.
नमुद गुन्ह्यांचे तपासकामी पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोना/९९२ ठेंगल, पोकॉ/५९५ बहिरे, पोकॉ/४३८ गटकुळ, पोकॉ/१५२४ रंदिल, पोकॉ/६८९ येवले, पोकॉ/८५६ गोसावी, पोकॉ/१२५९ शिंदे यांनी गोपनीय बातमीदारामार्फत व तांत्रिक विश्लेषणद्वारे आरोपी निष्पन्न करून १) दिपक रामदास बरडे वय ३२ वर्षे, रा.विखलठाण नं ०१, ता.करमाळा, जि.सोलापूर, मुळ रा. अमळनेर (भांडाचे), ता.पाटोदा, जि.बीड २) आकाश रामदास बरडे, वय २६ वर्षे, रा. अमळनेर (भांडाचे), ता. पाटोदा, जि.बीड यांनी सदर गुन्हा केला असल्याची माहिती मिळाल्याने पोकॉ/८५६ गोसावी, पोकॉ/१२५९ शिंदे, पोकॉ/६८९ येवले यांनी त्याचा शोध घेवून त्याना ताब्यात घेवून पोलीस ठाणेस आणले त्याचेकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाले आहेत सदर गुन्हा केल्याची अटक आरोपींनी कबुली दिल्याने गुन्ह्यातील चोरीस गेलेला १) ३,५०,०००/- रू किंमतीचा सोनालीका कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर आर.टी.ओ.रजिस्टर नं एम.एच. ४५ एफ ८०९९, चेसिस नं DZYSW259723/3, इंजिन नं 310E1131260490F3 असा असलेला २) २५,०००/- रू किंमतीचा पाळीचा मोगडा ट्रॅक्टरला जोडलेला असा एकुण ३,७५,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोफौ हणुमंत जाधव हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय व दमदार कामगिरी. श्री अतुल कुलकर्णी (भा.पो.से.) सो पोलीस अधीक्षक, मा. श्री. विजय कबाडे,सो अपर पोलीस अधीक्षक, मा. अंजना कृष्णा व्ही.एस.(भा.पो.से), सो. उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा उपविभाग, मा.श्री रणजीत माने, पोलीस निरीक्षक करमाळा पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली दिलीप ढेरे,सहा.पोलीस निरीक्षक, हणुमंत जाधव सहा.पो.उपनि., पोलीस नाईक ९९२ वैभव ठेंगल, पोलीस कॉन्स्टेबल ५९५ इसामिया बहिरे, पोलीस कॉन्स्टेबल ४३८ रविराज गटकुळ, पोलीस कॉन्स्टेबल १५२४ अमोल रंदिल, पोलीस कॉन्स्टेबल ६८९ योगेश येवले, पोलीस कॉन्स्टेबल ८५६ अर्जुन गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल १२५९ गणेश शिंदे सायबर पोलीस ठाणे कडील पोलीस कॉन्स्टेबल ७६८ जहिरान नाईकवाडी यांनी केली आहे.
करमाळा पोलिसांनी तीन लाख 75 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल वेळीच हस्तगत करून या प्रकरणाचा छडा लावल्याने करमाळा पोलिसांचे विशेष कौतुक होत आहे
गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
करमाळा पोलीस ठाणेची दमदार कामगिरी 3 लाख 75 हजार रुपये किंमतीचा चोरीचा ट्रॅक्टर व पाळीचा मोगडा जप्त
करमाळा पोलीस ठाणेची दमदार कामगिरी 3 लाख 75 हजार रुपये किंमतीचा चोरीचा ट्रॅक्टर व पाळीचा मोगडा जप्त
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा