Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२६

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

*करमाळा तालुका-- प्रतिनिधी* *आलिम. शेख* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत मंत्रालयीन पातळीवर समाधानकारक तोडगा काढावा, अशी मागणी भाजपा प्रदेश महिला उपाध्यक्षा रश्मी बागल यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे व सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे भ्रमणध्वनी द्वारे केली आहे. याबाबत बोलताना रश्मी बागल म्हणाल्या की, करमाळा तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. जिल्ह्यातील सहा तलावांसह मांगी तलाव परिसरातील शेतकऱ्यांच्या खासगी विहिरी व बोअरचा वीजपुरवठा महावितरणकडून सरसकट बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जळण्याचा धोका निर्माण झाला असून मोठे नुकसान होण्याची भीती आहे. या प्रश्नासाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू असून, शेतकऱ्यांच्या मागणीवर समाधानकारक तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे. उत्तर वडगाव, दक्षिण वडगाव, जातेगाव, पुनवर, मांगी, हिवरवाडी यांसह मांगी तलावावरील लाभार्थी शेतकऱ्यांना वीजपुरवठा बंदचा निर्णय नुकसानकारक ठरणार असल्याचे बागल यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थितीत पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असले तरी सध्या उभी असलेली पिके वाचविणेही आवश्यक आहे. शेतकऱ्यांची व्यथा मुख्यमंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. या प्रश्नावर लवकरच समाधानकारक तोडगा निघण्याची अपेक्षा आहे, असे रश्मी बागल यांनी सांगितले. ______________________________________ : चौकट > “मांगी तलाव परिसरातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद झाल्याने उभी पिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांची ही व्यथा मुख्यमंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा सुरू असून लवकरच या प्रश्नावर समाधानकारक तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. रश्मी बागल, भाजपा प्रदेश महिला उपाध्यक्षा _________________________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा