Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२६

*तामलवाडी येथील अर्धवट भूमिगत गटारीमुळे ग्रामस्थांच्या जीवाला धोका; डेंग्यू-मलेरियाची भीती - १० दिवसात काम न झाल्यास आंदोलनाचा इशारा*

*मुख्य संपादक* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-9730867448*
*तामलवाडी (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) दि. ३० :-* तामलवाडी येथील जैतुन महेबूब शेख यांचे घर ते महेश जगताप, जहागीर बेगडे व पांडुरंग लोंढे यांच्या घरासमोरील भूमिगत गटारीचे काम ठेकेदाराने अर्धवट सोडल्याने ग्रामस्थांच्या जीवाला आणि आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारी निवेदनानुसार, सदर ठिकाणचे गटारीचे चेंबर रस्त्यापासून तब्बल दीड ते दोन फूट उंचावर आहे . त्याच्या बाजूला आवश्यकतेप्रमाणे जमीन लेवेल पर्यंत मुरूम किंवा खडीची भराई केलेली नाही व सिमेंट काँक्रीट पाईप जमिनीत योग्य खोली करून बसवलेले नाहीत. त्यामुळे दीड-दोन फुटाचे खोलीचे खड्डे तयार झाले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यात अस्वच्छ पावसाचे पाणी साचून राहते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. यामुळे लहान मुले, महिला व वृद्धांना डेंग्यू, मलेरिया, उलटी-संडास, त्वचारोग सारखे साथीचे रोग होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच रात्रीच्या अंधारात या उंच चेंबरवर पाय अडकून एका वृद्ध व्यक्तीचा पाय मोडल्याची घटना घडली आहे. शाळकरी मुले व महिलांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. तसेच हा रस्ता मौजे तामलवाडी येथील ग्रामदैवत श्री शंभू महादेव मंदिराचा पर्याय रस्ता असून त्याचीही अवस्था आहे तिथे भाविकांना ये जा करताना खूप त्रास होत आहे *ग्रामसेवक कार्यालयात गैरहजर - मोबाईल तक्रारीकडेही दुर्लक्ष*
या बाबत ग्रामस्थ दि. २६/०९/२०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता ग्रामसेवक गैरहजर होते. त्यामुळे त्यांना मोबाईलवर कॉल करून तोंडी तक्रार नोंदवली होती, मात्र आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. हा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम १२४ अन्वये ग्रामस्थांच्या जीवितास व आरोग्यास धोका आहे.
*ग्रामस्थांच्या मागण्या :-* १) चेंबर जमीन लेवलमध्ये आणून सभोवताली मुरूम, खडी भरून रोलरने रस्ता समतल करावा. २) साचलेल्या घाण पाण्याचा निचरा करून तात्काळ औषध व धूर फवारणी करावी. ३) दि. २६/०९/२०२६ रोजी तक्रार घेऊनही दुर्लक्ष केल्याबद्दल ग्रामसेवकांवर खुलासा मागावा. ४) ग्रामस्थांची खात्री झाल्याशिवाय ठेकेदाराचे अंतिम पेमेंट देऊ नये. १० (दहा) दिवसात कार्यवाही न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन व आरोग्य विभागाकडे तक्रार करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर तक्रारदार सावंत शिवाजी रामकृष्ण (माजी सैनिक, अध्यक्ष आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था), रियाज जहाँगीर बेगडे, पांडुरंग गजेंद्र लोंढे, सौ. मंदाकिनी पांडुरंग लोंढे, सत्यभामा माणिक लोंढे, अशोक ज्ञानोबा घोटकर, जैतुन महेबूब शेख, मन्ना जहाँगीर बेगडे, महेबूब हुसेन शेख आदी १० ग्रामस्थांच्या सह्या आहेत. सदरील तक्रारी निवेदनाची प्रत गटविकास अधिकारी तुळजापूर, तालुका आरोग्य अधिकारी तुळजापूर व उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पंचायत) जि.प. धाराशिव यांना ई-मेल द्वारे व ग्रामविकास अधिकारी तामलवाडी यांना दिलेली आहे सदरील तक्रारबाबत तामलवाडी परिसरात चर्चेला उधाण आलं आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा