*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
३० सप्टेंबर २०२६* रोजी ध्वनी प्रदूषणाविरोधात खंबीरपणे आपली भूमिका मांडत, कोणत्याही दबावाची किंवा परिणामांची पर्वा न करता जनतेच्या हक्कांसाठी आवाज उठविणारे *विद्यानंद बापट* यांचा *ॲड. तोसिफ शेख* यांच्या कार्यालयात महात्मा फुले यांची पगडी देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना ॲड. तोसिफ शेख यांनी स्पष्टपणे सांगितले की, ही लढाई कोणत्याही धर्माची किंवा जातीची नसून, प्रत्येक माणसाला शांततेत आणि सन्मानाने जगण्याचा संविधानाने दिलेला अधिकार जपण्यासाठीची लढाई आहे.* ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर व शांततापूर्ण जीवनावर परिणाम होत असेल, तर त्याविरोधात आवाज उठविणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
तसेच, विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ॲड. तोसिफ शेख यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या खोट्या व त्रासदायक फौजदारी प्रकरणांच्या माध्यमातून दबाव निर्माण करण्याच्या प्रयत्नांविरोधात पूर्ण कायदेशीर लढा देण्यात येईल.* गरज भासल्यास या अन्यायाविरोधात लोकशाही मार्गाने रस्त्यावरची लढाईही लढण्याचा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, विद्यानंद बापट यांनी महात्मा फुले यांची पगडी स्वीकारत ध्वनी प्रदूषणाविरोधातील आपला आवाज आणखी बुलंद करण्याचा *दृढनिश्चय व्यक्त केला* आणि ॲड. तोसिफ शेख यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले.
धर्म-जातीच्या पलीकडे जाऊन, माणसाच्या शांततापूर्ण आणि सन्मानाने जगण्याच्या अधिकारासाठी ही लढाई आहे.”*
गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
*ध्वनी प्रदूषणाविरोधात आवाज उठविणारे विद्यानंद बापट यांचा ॲड. तोसिफ शेख यांच्याकडून महात्मा फुले यांची पगडी देऊन जाहीर सत्कार*
*ध्वनी प्रदूषणाविरोधात आवाज उठविणारे विद्यानंद बापट यांचा ॲड. तोसिफ शेख यांच्याकडून महात्मा फुले यांची पगडी देऊन जाहीर सत्कार*
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा