उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
गट नंबर दोन ते महाळुंग रस्त्याचे काम वर्क ऑर्डरप्रमाणे करण्याची मागणी; चौकशीची मागणी
नगरपंचायतीच्या हद्दीतील गट नंबर दोन ते महाळुंग रस्त्याचे काम वर्क ऑर्डरप्रमाणे होत नसल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी ठेकेदाराच्या कामाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीने सुरू असल्याचा आरोप तसेच गट नंबर दोन ते महात्मा फुलेनगर कमानीपर्यंत सिमेंट काँक्रेटचा रस्ता करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी गुरुवार, दि. १ ऑक्टोबरपासून गट नंबर दोन येथील विठ्ठल मंदिरासमोर बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात केली आहे.
महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत हद्दीतील गट नंबर दोन ते महाळुंग हा मुख्य रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक तथा भाजप गटनेते राहुल रेडे-पाटील यांनी आमदार बबनदादा शिंदे यांच्या आमदार निधीतून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून प्रभाग क्रमांक एक व दोनमधील अंतर्गत रस्ते, भूमिगत गटारी तसेच गट नंबर दोन ते महाळुंग मुख्य रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळवून आणली.
मात्र, या कामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना ठेकेदाराकडून वर्क ऑर्डरमधील अटी व निकषांचे पालन केले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याच्या कामात दर्जाबाबत तडजोड होत असल्याने सार्वजनिक निधीचा योग्य वापर होत आहे का, असा सवालही ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
गट नंबर दोनमधील विविध विकासकामांची चौकशी करून कामे वर्क ऑर्डरनुसार आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, तसेच गट नंबर दोन ते महात्मा फुलेनगर कमानीपर्यंत सिमेंट काँक्रेटचा रस्ता करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, सार्वजनिक निधीतून सुरू असलेल्या विकासकामांच्या गुणवत्तेबाबत ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केल्याने प्रशासन आणि संबंधित ठेकेदार याप्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
_______________________________________
१)चौकट
वर्क ऑर्डरनुसार कामे होत नसल्याने चौकशीची मागणी
“गट नंबर दोनमधील सर्व कामे वर्क ऑर्डरनुसार सुरू नाहीत. कामांच्या दर्जाबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे संबंधित कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी आम्ही बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.”
— फिरोज देशमुख, उपोषणकर्ते, महाळुंग-गट नंबर दोन
_______________________________________
२)चौकट
“शंका असल्यास चर्चेतून मार्ग काढू”
“आमदार बबनदादा शिंदे यांच्या आमदार निधीतून गट नंबर दोनमधील गटारी आणि अंतर्गत रस्त्यांसह विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्व कामे उत्कृष्ट पद्धतीने करण्यात येत आहेत. ग्रामस्थांना कोणत्याही कामाबाबत शंका असल्यास त्यावर चर्चा करून योग्य मार्ग काढला जाईल.”
__________________________________________
शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
गट नंबर दोन ते महाळुंग रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात ग्रामस्थांचे बेमुदत साखळी उपोषण
गट नंबर दोन ते महाळुंग रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात ग्रामस्थांचे बेमुदत साखळी उपोषण
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा