*कासेगाव,सोलापूर प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
सोलापूर : प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे संस्थापक आमदार ओमप्रकाश उपाख्य बच्चू कडू दिव्यांग बांधवांचं संघटन आणि त्यांच्या उन्नतीसाठी अष्टोप्रहर कार्यरत आहेत. आमदार बच्चू कडू दिव्यांगांच्या सर्वांगिण विकासासाठी आणि सन्मानासाठी संघर्ष करीत आहेत. ते येत्या 09 ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत, यावेळी दिव्यांग बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, असं आवाहन प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे जिल्हाध्यक्ष विजय पुरी यांनी केले.
'।। जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले। तोची साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा ।।' या ब्रिदावर कार्यरत असलेल्या
संस्थापक आमदार ओमप्रकाश (बच्चूभाऊ) कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या कासेगांव येथील शाखेचं उद्घाटन जिल्हाध्यक्ष विजय पुरी, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष दत्ता कांबळे यांच्यासह संस्थेच्या जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुरूवारी, 01 ऑक्टोबर रोजी दुपारी करण्यात आले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथील प्रहार दिव्यांग क्रांती संस्था शाखा उद्घाटन कार्यक्रमाला कासेगांवचे उपसरपंच शहाजहान शेख, उत्तर सोलापूर तालुका महिलाध्यक्ष सविता डोंगरे, उत्तर सोलापूर तालुका संपर्क प्रमुख होनमाने, उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी गावचे शाखाप्रमुख आनंद बेलभंडारे आणि ग्रामपंचायत सदस्य संभाजी चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिल्पाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर संस्थेच्या नामफलकाचं अनावरण करण्यात आलं. नामफलकाच्या अनावरणानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित कार्यक्रमात शाखाध्यक्ष राजकुमार वाडकर यांनी प्रास्ताविक केलं. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय पुरी बोलत होते.
दिव्यांग बांधव तनानं कमजोर असतात, मात्र मनाने मजबूत असतात. त्यांच्या वाटचालीला आधार देण्यासाठी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था राजस्तरावर काम करीत आहे. आगामी काळात त्यांचा निर्वाह निधी वाढीच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू आग्रही आहेत. सर्व दिव्यांग बांधवांनी प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेसोबत राहावं, असंही जिल्हाध्यक्ष पुरी यांनी म्हटले.
यावेळी उपसरपंच शहाजहान शेख यांनी ग्रामपंचायतीमार्फत दिव्यांग बांधवांसाठी राबविण्यात उपक्रमांची माहिती देत, येत्या काळातही शासनाच्या निर्देशाप्रमाणं सर्व योजनांचा लाभ दिव्यांगांपर्यंत पोहोचविण्यासाठी कटीबध्द आहोत, असं सांगितले.
यावेळी शाखा उपाध्यक्ष गणेश माने, शाखा सचिव करुणा जाधव, शाखा खजिनदार सुखदेव गायकवाड आणि शाखा संपर्क प्रमुख इक्बाल शेख, विश्वजीत चौगुले, उस्मान शेख यांच्यासह शाखा सदस्य मनोहर जाधव, तुकाराम सुरवसे, वसंत गुरव, सुधाकर परीट, श्रीकांत हब्बु, शशिकांत चव्हाण, अनिल मेटकरी, उमेश स्वामी, दिपक जाधव, सोहेल शेख, लखन गुरव, सत्यवान गायकवाड, प्रमोद चौगुले, हुजेफा तांबोळी, सहदेव हट्टीवाले, बाळकृष्ण भाजीभाकरे, मिराबाई जाधव, ज्ञानेश्वरी अवताडे, निता काळे, कावेरी जाधव, शितल हेडे, दिपाली चव्हाण, संध्या जाधव, द्वारकाबाई चव्हाण, प्रियंका भोजने, दिपाली भोजने, रसिका भोज आणि लक्ष्मी लबडे आदी उपस्थित होते.
**
शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
आमदार बच्चू कडू यांचा दिव्यांगांच्या सर्वांगिण विकास आणि सन्मानासाठी संघर्ष : जिल्हाध्यक्ष विजय पुरी प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या कासेगांव शाखेचं जिल्हाध्यक्ष विजय पुरी यांच्या हस्ते उद्घाटन
आमदार बच्चू कडू यांचा दिव्यांगांच्या सर्वांगिण विकास आणि सन्मानासाठी संघर्ष : जिल्हाध्यक्ष विजय पुरी प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या कासेगांव शाखेचं जिल्हाध्यक्ष विजय पुरी यांच्या हस्ते उद्घाटन
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा