*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
लोकजनशक्ती पार्टी रामविलास व महाकाली डेअरी फार्म भिवरवाडी तालुका करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय रामविलास पासवान यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त आज सोलापूर येथे गरीब व गरजू महिलांना मोफत साड्या वाटपाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती लोकजनशक्ती पार्टी रामविलास चे महाराष्ट्र प्रांतिक सदस्य तसेच करमाळा तालुक्यातील भिवरवाडी महाकाली डेअरी फार्म चे व्यवस्थापक युवा नेते रामचंद्र आरकीले यांनी दिली
याबाबत अधिक माहिती देताना आरकिले म्हणाले की आमचे राष्ट्रीय नेते तसेच उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या मार्गदर्शनातून तसेच लोक जनशक्ती रामविलास पासवान संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शमीम हवा यांच्या विशेष सहकार्याने आम्ही गेली कित्येक वर्षापासून केंद्रीय मंत्री स्वर्गीय रामविलास पासवान यांची पुण्यतिथी निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवित असून यामध्ये गोरगरीब व गरजू महिलांना मोफत साड्या वाटपाचा कार्यक्रम आजपर्यंत करत आलेलो आहे त्याच अनुषंगाने उद्या दिनांक 8 ऑक्टोंबर 2026 रोजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय रामविलास पासवान यांच्या पुण्यस्मरणानिमित्त महिलांना मोफत साड्या वाटपाचा कार्यक्रम सोलापूर येथील वेलकम हॉल, मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर या ठिकाणी सायंकाळी पाच वाजता सदरचा कार्यक्रम ठेवलेला आहे भारतीय जनता पार्टीचे सोलापूर शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या शुभहस्ते सदर साड्या वाटपाचा कार्यक्रम होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाच्या नगरसेविका मीनाक्षी कडगंची हे उपस्थित राहणार असल्याचे श्री आरकिले यांनी बोलताना सांगितले
सदरच्या मोफत साड्या वाटपाच्या कार्यक्रमाला सोलापूर शहर तसेच जिल्ह्यातील महिलांनी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन लोक जनशक्ती पार्टी रामविलास पासवान चे सोलापूर शहराध्यक्ष अशोक ससाने, जिल्हा सचिव अशोक डोलारे, तसेच दक्षिण सोलापूरचे लोक जनशक्ती रामविलास पासवान चे तालुका अध्यक्ष भाग्यश्री ननवरे याशिवाय अजित आरकिले व सुजित आरकिले यांनी केली आहे
गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय रामविलास पासवान यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज सोलापूर येथे लोक जनशक्ती रामविलास पार्टीच्या वतीने मोफत साड्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न होणार
माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय रामविलास पासवान यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज सोलापूर येथे लोक जनशक्ती रामविलास पार्टीच्या वतीने मोफत साड्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न होणार
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा