*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*अलिमभाई शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
पावसाने दडी मारल्याने पूर्व भागास वरदायिनी ठरत असलेल्या दहीगाव उपसा सिंचनच्या आवर्तनाची पाहणी श्री नारायण आबा पाटील यांनी केली.आज प्रत्यक्ष कार्यस्थळी जाऊन गुळसडी येथील यादव तलाव व पांडे चारीची पाहणी केली . पाण्याचा विसर्ग व आवर्तनाचे नियोजन या बाबत अधिकाऱ्याशी चर्चा केली.प्रत्यक्षात शेतकऱ्यांशी हि सवांद साधला आमदार नारायण आबा पाटील यांच्या मार्गदर्शना खाली गेले तीन महिन्या पासून दहिगाव उपसाचे आवर्तन अविरत चालू आहे त्या मुळे पूर्व भागातील शेतातील उभ्या पिकांना काही प्रमाणात जीवनदान मिळाले तर काही ठिकाणी जनावरांचा चारा पाण्याची सोय करण्यात यश आले.
अनेक गावांचा पिण्याच्या पाणी पुरवठा योजना ज्या तलावावरून आहेत सदर तलावात पाणी सोडणे चालू आहे.आजच्या या पाहणी दौऱ्यादरम्यान शिवाजी पाटील,माऊली कळसे, महावीर कळसे, समाधान यादव, भाऊ भोसले, भाऊ भंडारे, धनंजय भंडारे, बाळू शियाळ राजू शेख, बाबू शेख, अशोक गाडे, जगदीश गायकवाड प्रताप बागल, नितीन भंडारे कल्याण निकम महादेव क्षीरसागर,शेलगाव (क) येथील आत्माराम वीर,संदीप पाटील,शिंदे गुरुजी तर पांडे येथील गहिनीनाथ दुधे , मा.सरपंच अनारसे , तसेच वरकटणे येथील जगन्नाथ मस्कर तसेच कनिष्ठ अभियंता विलास देवकाते,कौस्तुभ सौंदणे आदी उपस्थित होते. तसेच गुळसडी ग्रामस्थांच्या वतीने आमदार श्री नारायण आबा पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
*आमदार श्री नारायण आबा पाटील यांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेची केली पाहणी गुळसडी,पांडे परिसरातील चारींचा घेतला अहवाल*
*आमदार श्री नारायण आबा पाटील यांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेची केली पाहणी गुळसडी,पांडे परिसरातील चारींचा घेतला अहवाल*
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा