*अकलूज- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
शंकरनगर अकलूज येथील स्व,हाजी रहिमतुल्ला मोहम्मद शेख यांच्या १३व्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ रोजी विविध कार्यक्रम संपन्न झाला असून या पुण्यतिथीनिमित्त दुपारी ४ वाजता त्यांच्या समाधीवर पुष्पचादर अर्पण करुन
मौलाना अलहाज मौलाना अब्दुल गनी शेख, मौलाना जाकीर हुसेन शेख, मौलाना अब्दुल वाहिद, हाफिज व कारी रफिक साहब, हाफीज नौशाद साहब,मुफ्ती गुलाम हुसेन साहब, मौलाना सादत रजा, यांनी फातेहा खानीचा (प्रार्थना )विधी केला
त्यानंतर अकलूज सोफियानगर येथील बज्मेअनवारे सोफिया मदरसा शहाबुल उलूम मधील विद्यार्थ्यांना व महादेव नगर अकलुज येथील मदरसा जामिया बरकाते फातिमा मधील विद्यार्थ्यांनीनां प्रत्येकी एक पवित्र ग्रंथ कुराण व इतर धार्मिक पुस्तके देण्यात आली तसेच लुमेवाडी (मुसलमानवाडी)ता. इंदापूर येथील मदरसा अलजामियतुल चिश्तिया फतहुल उलूम मदरसाला १२ पवित्र ग्रंथ कुराण व इतर धार्मिक वाचनीय पुस्तके प्रदान करून या तिन्ही मदरशातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला
याप्रसंगी बोलताना मौलाना अब्दुल गणी साहब स्व.हाजी रहिमतुल्ला मोहम्मद शेख यांच्याबाबत म्हणाले की कै. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे ते त्याकाळी खंदे समर्थक मानले जात मुस्लिम समाजाचे उन्नतीसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून त्यांच्या या कार्याला माळशिरस तालुक्यातील मुस्लिम समाज केव्हाही विसरणार नाही
याप्रसंगी बज्मे अनवारे सोफिया चे सचिव युसुफ भाई शेख , हुसेन कासिम शेख, रफिक भाई मुल्ला, बाबुभाई शेख जैनुद्दीन शेख, जोहर आवटे, यून्नुस भाई शेख, आय्युब मुलाणी, सलीम शेख ,वारिस अब्दुल गणी शेख लुमेवाडी, सलीम शहाबुद्दीन सय्यद, मुख्तार इन्नुस भाई बागवान, जुबेर भाई दुरुगकर, मदरशातील विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते
हा कार्यक्रम दर्गा मस्जिद चे हुसेन काशीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला
शेवटी स्व, हाजी रहिमतुल्ला मोहम्मद शेख यांचे सुपुत्र इंजिनियर शहाजहान रहिमतुल्ला शेख यांना सर्वांचे आभार व्यक्त केले
रविवार, ४ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
स्व:-हाजी रहिमतुल्ला मोहम्मद शेख यांच्या १३व्या पुण्यतिथीनिमित्त मदरसा मधील विद्यार्थ्यांना पवित्र ग्रंथ कुराण चे प्रदान
स्व:-हाजी रहिमतुल्ला मोहम्मद शेख यांच्या १३व्या पुण्यतिथीनिमित्त मदरसा मधील विद्यार्थ्यांना पवित्र ग्रंथ कुराण चे प्रदान
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा