Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२६

*अकलूज आरटीओच्या तपासणी पथकाची अपघातग्रस्तांना तातडीची मदत करुन दाखवले माणुसकीचे दर्शन*

*अकलूज -प्रतिनिधी* *केदार- लोहकरे* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
3 ऑक्टोबर 2026 रोजी पहाटे सुमारे साडेचार वाजता अकलूज आरटीओ कार्यालयाच्या तपासणी पथकास माळशिरस- वेळापूर रस्त्यावर वेळापूर नजिक एक तरुण रक्तबंबाळ अवस्थेत मदत मागताना आढळला. पथकातील अधिकाऱ्यांनी तातडीने आपले वाहन या युवकाच्या मदतीसाठी थांबवले. त्यावेळी तेथे मोटार वाहन क्रमांक MH-14 FS 4864 हे रस्त्याच्या कडेला चारीमध्ये गेल्याचे आढळले.या वाहनाच्या बाजूला आणखी एक युवक अत्यावस्थेत पडलेला आढळला.या अवस्थेतील तरुणाच्या मदतीसाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता असल्याची गरज तपासणी पथकाच्या लक्षात आली.त्यानंतर तपासणी पथकातील अधिकारी यांनी तातडीने आपत्कालीन रुग्णवाहिका क्रमांक 108 व महामार्ग मदत क्रमांक 1033 यावर कॉल करून दोन्ही रुग्णवाहिका अपघातस्थळी बोलावून घेतल्या कारमधील तोहीन अजमल गावंडे (वय २१), मुस्तकीन बबलु गावंडे (वय २२), यश बंडू वाघमारे (वय २१),स्वप्निल महादेव कोळी (वय २१) या चारही जखमी तरुणांना पुढील उपचारासाठी अकलूज येथील रुग्णालयात उपचारासाठी तातडीने रवाना केले. मदत करत असताना वाहनात आढळलेल्या आधार कार्ड वरून सदर वाहनातील तरुण हे जत (जि.सांगली) येथील असल्याचे आढळले.रस्त्यावर अपघात झाल्याचे पाहून पाठीमागून येणाऱ्या काही वाहनाचे चालक मदतीसाठी थांबले.सुदैवाने त्यातले दोघेजण हे जतचे होते.त्यांच्या मदतीने अपघातग्रस्त युवकांच्या घरी संपर्क करून अपघात झाल्याचे कळविण्यात आले आहे.हे संपूर्ण मदत कार्य स्थानिक नागरिक व पोलीस यांच्या मदतीने आरटीओ कार्यालयप्रमुख संदीप म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनात तपासणी पथकातील अधिकारी सहायक मोटार वाहन निरीक्षक शिवाजी लाळगे व सहायक मोटार वाहन निरीक्षक कांतीलाल गरगडे,वाहन चालक बाबू झणझण यांनी पार पाडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा