Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२६

ग्रामीण युवतींना धार्मिक प्रवासाची सुवर्णसंधी - भाग्यजित जाधव (पाटील ) व अँड. पुजा झोळे यांच्या पुढाकारातून यात्रा यशस्वी -

*करमाळा तालुका-- प्रतिनिधी* *आलिम. शेख* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीची जपणूक करत भाग्यजित जाधव (पाटील)यांच्या वतीने आणि अँड. पुजा झोळे यांच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी अक्कलकोट–तुळजापूर–येडेश्वरी तीर्थदर्शन यात्रेचे विशेष आयोजन करण्यात आले. या यात्रेत ग्रामीण भागातील सुमारे ५५ युवतींनी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात या तीन प्रमुख तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले. शहराच्या धर्तीवर ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना धार्मिक आणि सांस्कृतिक अनुभवापासून वंचित न ठेवता, त्यांना आध्यात्मिक प्रवासाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. यात्रेदरम्यान सर्व युवतींनी भक्तिभावाने पूजाअर्चा व दर्शन घेतले. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी मिलिंद गुंजाळ, अक्षय शेळके, समृद्धी भोर आणि निलेश काळभोर यांनी विशेष परिश्रम घेतले व उत्तम नियोजन केले. ग्रामीण भागातील युवतींमध्ये भक्ती, चांगले संस्कार आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून मोठे कौतुक होत आहे. या यशस्वी उपक्रमामुळे सहभागी युवतींनी आनंद व्यक्त केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा