*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
उजनीचे पाणी शेतीसाठी, पिण्यासाठी आणि मच्छीमारांच्या उपजीविकेसाठीच राखले पाहिजे!उजनी धरण परिसरातील प्रस्तावित AI डेटा सेंटर, तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प आणि स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर या प्रकल्पांविरोधात आज (३१ ऑक्टोबर) झालेल्या शेतकरी, धरणग्रस्त व मच्छीमारांच्या आंदोलनात आमदार नारायण (आबा) गोविंदराव पाटील यांनी प्रत्यक्ष सहभागी होत ठाम विरोध दर्शविला.
या प्रकल्पाच्या विरोधात तालुक्यात सर्वप्रथम कार्यकर्त्यांची बैठक घेऊन या प्रकल्पाच्या विरोधात लढा अधिक तीव्र पद्धतीने कसा करता येईल याबाबत कार्यकर्त्यांशी विचार केला. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गावोगावी या प्रकल्पाचे विरोधात जनजागृती करण्याचे मोठे काम केले आहे.
शेतकरी, धरणग्रस्त आणि मच्छीमारांच्या हिताशी कोणतीही तडजोड नाही!
उजनीचे पाणी हे हजारो शेतकऱ्यांच्या शेतीचा, लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि मच्छीमार कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा आधार आहे. त्यामुळे उजनीच्या पाण्यावर आणि नैसर्गिक संसाधनांवर परिणाम करणारे प्रस्तावित प्रकल्प अन्य योग्य ठिकाणी हलविण्यात यावेत, अशी ठाम भूमिका आबांनी यापूर्वीही शासनदरबारी मांडली आहे.
आजच्या आंदोलनातूनही त्यांनी शेतकरी आणि धरणग्रस्तांच्या लढ्याला आपला सक्रिय पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.यावेळी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार रोहित पवार, आमदार अभिजित पाटील, आमदार प्रतापसिंह पाटील, माजी मंञी महादेव जानकर, माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्यासह उजनीकाठचे शेतकरी व सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
एकच निर्धार... उजनी वाचली पाहिजे!शेतकऱ्यांचे पाणी टिकले पाहिजे!धरणग्रस्त आणि मच्छीमारांचे हक्क अबाधित राहिले पाहिजेत!उजनीच्या अस्तित्वाच्या लढ्यात शेतकऱ्यांसोबत आमदार नारायण आबा पाटील!*हे दिसून आले







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा