Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२६

शंकरराव मोहिते महाविद्यालयात नशामुक्त भारत विशेष कार्यशाळा संपन्न.*

 अकलूज प्रतिनिधी 

केदार लोहकरे 

टाइम्स 45 न्यूज मराठी



"व्यसनामुळे मनुष्याचे आयुष्य उध्वस्त होत चालले आहे त्यामुळे आपले राष्ट्र कमकुवत होत चालले आहे.असे मत  व्यसन जाणीव जागृती कार्यक्रम महाराष्ट्र शासनाचे सोलापूर जिल्हा समन्वयक, व्यसनमुक्त युवक संघाचे प्रा.धनंजय देशमुख यांनी व्यक्त केले.ते अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयात नशामुक्त भारत अभियाना अंतर्गत विशेष कार्यशाळा आयोजित केली होती त्यावेळेस ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवप्रसाद टिळेकर होते.प्रमुख अतिथी म्हणून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.राजेंद्र वडजे,मेरा भारत युवा विभागाचे अनिल हिंगे,सुभाष चव्हाण,राष्ट्रीय सेवा योजना माळशिरसचे विभागीय समन्वयक डॉ.अनिल लोंढे तसेच माळशिरस विभागातील सर्व महाविद्यालयांचे कार्यक्रमाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

             त्यावेळी पुढे बोलताना प्रा. देशमुख  म्हणाले की," कुमारवय व युवा अवस्थेतच  व्यसनांचा पगडा मुलांच्या मनावर निर्माण होत आहे म्हणून सर्वांनी सजग राहणे आवश्यक आहे.वय वाढीच्या वयात आहार महत्त्वाचा आहे.आहारामध्ये आवश्यक आहार व आकर्षक आहार यातील फरक ओळखून योग्य ते निवडायला विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे.     

            महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवप्रसाद टिळेकर यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.अनिल हिंगे यांनी प्रास्ताविक केले.महाविद्यालयाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.दत्तात्रय मगर यांनी उपस्थितांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना नशा मुक्तीची शपथ दिली.प्रा.स्मिता पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. सज्जन पवार यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा