Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२६

माळशिरस तालुक्यातील एकमेव द्वितीय देवीचे मंदिर वज्रेश्वरी माता ! लेख क्रमांक -१

*मंडल कृषी अधिकारी --सतीश कचरे,अकलुज*
माळशिरस तालुक्यामध्ये माळीनगर सवत गव्हाण तांबवे रोडवर अकलूज पासून सर्वसाधारणपणे दहा किलोमीटर अंतरावर निरा नदीच्या काठी बिजवडी तांबवे व सवत गाव यांच्या सेवेवर असलेले महाराष्ट्रातील वज्रेश्वरी हे द्वितीय मंदिर आहे ! या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वसाधारणपणे 300 ते 400 वर्ष हेमांडपंती दगडी पुरातन मंदिर असून निरा नदीमध्ये या मंदिराच्या सलग्न वज्रेश्वरी कुंड किंवा डोह कि ज्याच्या खोलीचा थांग - पत्ता लागत नाही व कसल्याही भीषण दुष्काळात पाणी असणारा डोह आहे .मंदिराच्या परिसरात समोर उजव्या बाजूला दगडाचे मोठे ताट असून या ताटामध्ये सर्व सुहासिनी एकत्र जेवण्याची जुनी परंपरा आहे
.मंदिरापासून वज्रेश्वरी कुंडाच्या मार्गावर इच्छाधारी महादेवाची लिंग असून यावर मुद्रा चिटकवून इच्छा व्यक्त करून हातात धरले असतात उजवा कौल दिला तर इच्छापूर्ती शत प्रतिशत होत असल्याचा अनुभव आहे . निसर्ग रम्य नयनरम्य स्मशान शांत असलेला परिसर आहे नवरात्र कोजागरी पोर्णीम पोर्णीमा मंगळवार शुक्रवार भावीकांची गर्दी असते . मंदिरात एकमेवद्वितीय मातेची मूर्ती विलोभणीय नवसाला पावणारी मृर्ती आहे . मंदीर हत्तीएवढा मासा ,मंदीराच्या समोर व पाठीमागे माशा चे शिल्प, उंटाएवढा झिंगा बलाढय गाई व तिच्या पाऊल खुणा , उंच उत्तूंग दिपमाळ ,व्यापारी माणसाने केलेली स्थापना याबाबत व विषयी खुप आख्खेयिका आहेत . तरी भावीक श्रद्धाळू भक्तीने या नवरात्रात एकदा दर्शन घेऊन दिव्य दर्शन व लाभ घ्यावा ! संकलन - सेवारत्न श्री सतिश शांताबाई कुंडलिक कचरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा