Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १० ऑक्टोबर, २०२६

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बैलपोळा संपन्न पावसाअभावी चारा-पाण्याची टंचाई; बळीराजाचा पारंपरिक सण साधेपणाने साजरा

*कार्यकारी संपादक* *एस. बी. तांबोळी* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-8378081147*
-----: शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सण असलेला बैलपोळा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. शेतीच्या कामात वर्षभर मोलाची साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी बैलांना सजवून त्यांचे पूजन केले. मात्र, पावसाअभावी निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि चारा-पाण्याच्या टंचाईमुळे यंदाच्या पोळा सणावर चिंतेचे सावट दिसून आले.
बैलपोळा हा शेतकरी आणि बैल यांच्यातील अतूट नात्याचे प्रतीक मानला जातो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना या दिवशी विश्रांती देऊन त्यांना आंघोळ घालणे, शिंगांना हिंगोळ रंग, बेगड लावणे, अंगावर झूल टाकणे, गळ्यात घुंगरांच्या माळा घालणे, तसेच त्यांचे औक्षण करून पूजा करण्याची परंपरा आहे. शेतकऱ्यांनी ही परंपरा जपत बैलपोळा साजरा केला. यावर्षी पावसाने ओढ दिल्याने शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. पिकांना पाण्याची गरज असताना पाण्याची उपलब्धता कमी झाली असून, जनावरांसाठी हिरवा चारा मिळविणेही कठीण झाले आहे. चारा आणि पाणी उपलब्ध करण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे बैलपोळ्याचा आनंद साजरा करतानाही शेतकऱ्यांच्या मनात आगामी काळातील चारा-पाण्याच्या नियोजनाची चिंता असल्याचे पिंपरी बुद्रुक येथील शेतकरी प्राजक्ता व केशव बोडके यांनी व्यक्त केली. एकीकडे परंपरा जपण्याचा आनंद, तर दुसरीकडे दुष्काळाचे संकट अशा दुहेरी परिस्थितीत शेतकऱ्यांनी यंदाचा बैलपोळा साजरा केला. शासनाने दुष्काळी परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून जनावरांसाठी चारा उपलब्धता, पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि शेतकऱ्यांना आवश्यक मदत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा केशव बोडके, बाजीराव मोहिते, अशोक बोडके सुभाष बोडके राहुल बागल मुकुंद कांबळे यांनी व्यक्त केली आहे. फोटो - पिंपरी बुद्रुक येथील प्रगतिशील शेतकरी प्राजक्ता व केशव बोडके कुटूंबियांनी बैलपोळा परंपरेप्रमाणे साजरा केला. ------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा