*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयातील अकरावी सायन्स चा विद्यार्थी महेफुज अब्दुलकरीम पठाण या विद्यार्थ्याने पाच किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे या स्पर्धेत एकूण 400 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता याशिवाय रिले तसेच बांबू उडी यामध्ये त्याचा दुसरा क्रमांक आला आहे सदरच्या स्पर्धा ह्या करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाल्या सदर स्पर्धा या तालुकास्तरीय स्पर्धा म्हणून आयोजित केल्या होत्या त्याची पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे
महफूज पठाण हा करमाळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील आयटी सहाय्यक क्लार्क अब्दुल करीम हामजे खान पठाण यांचा चिरंजीव असून प्रसिद्ध विधीज्ञ एडवोकेट आलिम पठाण यांचा तो पुतण्या आहे त्याला महात्मा गांधी विद्यालयातील क्रीडा शिक्षक दळवे सर पवार सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले
महेफूज पठाण याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्याचे संस्थेचे चेअरमन माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शंभुराजे जगताप तसेच विद्यालयाचे प्राचार्य अनिस बागवान, पर्यवेक्षक महेश कांबळे, पर्यवेक्षिका सौ नवले मॅडम यांनी विशेष अभिनंदन केले आहे
शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थी महेफुज पठाण याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थी महेफुज पठाण याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा