इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणजे अहिंसेचे जागतिक विद्यापीठ असून जागतिक शांततेसाठी त्यांच्या विचारांचे आचरण करण्याची संपूर्ण जगाला गरज आहे. गांधी विचार हे संपूर्ण जगाला तारक आहेत असे प्रतिपादन नागरी संघर्ष समितीचे संस्थापक, प्रा. कृष्णा ताटे यांनी केले. इंदापूर राष्ट्रसेवा दल, एसटी आगार तसेच नागरी संघर्ष समिती यांच्या वतीने इंदापूर बसस्थानक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या फोटोंना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रा. कृष्णा ताटे पुढे
म्हणाले, महात्मा गांधी यांच्या अहिंसावादी विचारामुळे अहिंसा मार्गाने
आंदोलन होऊन १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देशास स्वातंत्र्य मिळाले. मात्र याचे सुशासन व सुराज्य करण्याची जबाबदारी अपना सर्वांची आहे. पंडित लालबहादुर शास्त्री यांनी जय जवान, जय किसान ही घोषणा देऊन देशाचा सर्वांगीण विकास होण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी पाकिस्तान विरुद्ध युद्ध जिंकून जगामध्ये भारत देशाची मान उंच केली. त्यांच्या विचारांचे आचरण करून देश बलवान करण्यासाठी सर्वांनी योगदान देणे ही काळाची गरज आहे.
इंदापूर एसटी आगाराचे
व्यवस्थापक हनुमंत गोसावी म्हणाले, शांततामय सहजीवनासाठी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांची गरज देशाला असल्यामुळे त्यांचे
विचार संपूर्ण जगाला तारतील.
यावेळी अभिवादन सभेला स्थानक प्रमुख संजय वायदंडे, एसटी आगाराचे अधिकारी व कर्मचारी वर्ग,
राष्ट्रसेवा दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष रमेशआबा शिंदे, महाराष्ट्र संघटक गफूरभाई सय्यद, इंदापूर संघर्ष
समितीचे मार्गदर्शक हमीदभाई अत्तार,
महादेव चव्हाण, हनुमंत बोंगाणे, भारत बोराटे, विक्रम चंदनशिवे, विजय नवगिरे, गजानन पवार, सचिन व्हावळ यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसेची जागतिक शांततेसाठी संपूर्ण जगाला गरज : कृष्णा ताटे. राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच स्वर्गीय पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांचे विचार आज देखील प्रेरणादायी : हनुमंत गोसावी.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसेची जागतिक शांततेसाठी संपूर्ण जगाला गरज : कृष्णा ताटे. राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच स्वर्गीय पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांचे विचार आज देखील प्रेरणादायी : हनुमंत गोसावी.
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा