Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२६

कर्मयोगी कारखान्याची निवडणूक होणार की कारखाना बिनविरोध होणार याकडे सर्वांचे लक्ष.

इंदापूर, डॉ. संदेश शहा. टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
बुधवार, १४ ऑक्टोबर २६ उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील महत्त्वपूर्ण असलेल्या कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक १३ नोव्हेंबर रोजी होणार. आहे. शेतकरी संघटनेचे नेते निलेश देवकर यांनी आपले सहकारी गुलाबराव फलफले यांच्यासमवेत आपला अर्ज भरून निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की प्रत्यक्ष निवडणूक होणार याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. _______________________________________
कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिकनिवडणूक 2026 ते 2031 निवडणुकीसाठी आज उत्पादक सभासद कालठण गट नंबर 2 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला सोबत चळवळीतील सहकारी गुलाबराव फलफले _'___________________________________& कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार स्वर्गीय शंकररावजी पाटील यांनी उजनी धरणात पाणी साठविण्यास सुरुवात झाल्यामुळे इंदापूर तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात वाढलेल्या ऊस क्षेत्रास न्याय देण्यासाठी हा कारखाना इंदापूर सहकारी साखर कारखाना या नावाने सुरू केला. त्यांच्या निधनानंतर या कारखान्याचे नाव कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना असे ठेवण्यात आले. वालचंदनगर येथील हा खाजगी कारखाना कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष शंकररावजी पाटील, उपाध्यक्ष गोकुळदास शहा तसेच संचालक मंडळाने सहकार केंद्रबिंदू मानून शेतकरी सभासदांच्या मालकीचा बनविला. त्यामुळे उजनी धरण पाणलोट क्षेत्रात क्रांती झाली. कारखान्याने राष्ट्रीय पातळीवरचे उत्कृष्ट अर्थव्यवस्थापनाचे तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळवले. मात्र आता कारखान्याकडे कर्मचाऱ्यांचे तसेच शेतकऱ्यांच्या गाळप ऊसाचे पैसे देण्यासाठी नाहीत. सध्या या कारखान्याचे अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील असून कारखान्याच्या सभासदांचा मात्र पैसे वेळेत मिळत नसल्यामुळे हर्ष मावळला आहे. त्यातच हर्षवर्धन पाटील हे नगरपरिषद निवडणुकीत भाजप चे नेते प्रवीण माने, राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाहेर पडलेले मात्र नगरपरिषद निवडणुकी नंतर भाजप मध्ये गेलेले प्रदीप गारटकर यांच्या समवेत होते तर पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांनी दिलजमाई केल्यामुळे श्री पाटील हे राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सोबत होते. त्यामुळे सर्व नेत्यांचे राजकीय साटेलोटे झाल्यामुळे हे नेते एकमेकांविरुद्ध कारखाना निवडणुकीत लढणार की जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या पुढाकारातून ही निवडणूक बिनविरोध होणार का याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. कारखान्याचे वैशिष्ट म्हणजे कार्यक्षेत्रातील ऊस दर्जेदार असून वाहतूक जवळची आहे. सर्व उपपदार्थ निर्मिती प्रकल्प सुरू आहेत तरी देखील कारखान्याचे अर्थकारण बिघडले आहे. कर्मयोगी कारखाना कार्यक्षेत्रातील लोकांनी व्यवस्थित मतदान न केल्यामुळे आपण पडल्याची भावना हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये असल्याने ते कारखान्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत अशी भावना सभासंदामध्ये आहे. त्यामुळे सर्वच पातळीवर सध्या गोंधळ आहे. कारखान्यावर निश्चित कर्ज किती आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे. कारखाना टॉप टेन मध्ये आणणार अशी ग्वाही देणारे हर्षवर्धन पाटील यांना देखील कारखान्याचे अर्थकारण सांभाळता आले नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे निवडणुकी संदर्भात विविध चर्चा रंगल्या आहेत. त्यातच हर्षवर्धन पाटील यांनी हा सहकारी कारखाना खाजगी ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाळासाहेब बोत्रे यांना चालविण्यास दिला. याला सहकारातील सहकार - खाजगी असे गोंडस नाव देण्यात आले. त्यामुळे शंकर राव पाटील यांच्या धोरणाला हरताळ फासला असल्याचे दिसून येते. त्यामुळे कारखान्याची वाटचाल दिवाळखोरीकडे सुरू आहे. त्यातच नऊ लाख मेट्रिक टन गाळप क्षमता असताना देखील तसेच कार्यक्षेत्रात पंधरा लाख टन ऊस उपलब्ध होत असताना देखील गाळप व्यवस्थित होत नसल्याने तसेच गाळप उसास इतर कारखान्याच्या तुलनेत व्यवस्थित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी परिसरातील इतर पाच कारखान्यांना ऊस घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे कारखान्याचे अर्थकारण वरचेवर बिघडत गेले. हर्षवर्धन पाटील यांनी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष शंकररावजी पाटील यांची कन्या पद्माताई भोसले तसेच संस्थापक उपाध्यक्ष गोकुळदास शहा यांचे चिरंजीव मुकुंद शहा किंवा पुतणे भरत शहा यांच्या ताब्यात देऊन कारखाना दिवाळखोरी जाण्यापासून वाचवावा असे राजकीय धुरिणांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, जेष्ठ नेते किसनराव जावळे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी लक्ष घातले नाही. त्यामुळे त्यांची कर्मयोगी बद्दल काय भूमिका राहणार याची चर्चा सुरू आहे. तालुक्याच्या राजकारणात हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यातील इंदापूर तालुका खरेदी विक्री संघ तसेच इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती यापूर्वी जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या ताब्यात गेली आहे. कर्मयोगी कारखाना निवडणुकीत देखील त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सोनाई दूध संघाचे अध्यक्ष दशरथ माने या निवडणुकीत सक्रिय होणार की शांत राहणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा