Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १८ ऑक्टोबर, २०२६

दुष्काळात तेरावा... महावितरणच्या तारांच्या घर्षणाने एक एकर ऊस, ठिबक पाइप, वायर जळून खाक; शेतकरी हवालदिल*

*मंगरूळ --प्रतिनिधी* *चांदसाहेब शेख* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
तुळजापूर तालुक्यातील मौजे देवसिंगा नळ येथे महावितरणच्या निष्काळजीपणाचा फटका एका तरुण शेतकऱ्याला बसला आहे. महावितरणच्या वीज तारांच्या घर्षणातून निघालेल्या ठिणगीमुळे एक एकर ऊस ,ठिबक,पाइप,वायर जळून खाक झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मौजे देवसिंगा नळ येथील तरुण शेतकरी शेकुंबर सिलेमान शेख यांच्या गट नंबर 56 शेतातील हा प्रकार आहे. शेताच्या बांधावरून गेलेल्या महावितरणच्या लोंबकळणाऱ्या विजेच्या तारांमध्ये वाऱ्यामुळे घर्षण झाले आणि त्यातून ठिणगी उसाच्या शेतात पडली. पाहता-पाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि एक एकरातील उभा ऊस , ठिबक वायर, पाइप जळून राख झाला.
शेतकऱ्याने आणि गावकऱ्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु वारा जास्त असल्याने आग आटोक्यात आली नाही.शेतकरी हवालदिल, लाखोंचे नुकसान या आगीत शेकुंबर शेख यांचे सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दुष्काळाच्या झळा सहन करत, कर्ज काढून कसाबसा उभा केलेला ऊस डोळ्यादेखत जळताना पाहून शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महावितरणच्या विरोधात संताप या घटनेमुळे देवसिंगा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये महावितरणच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी वीज तारा लोंबकळत आहेत, तारा नादुरुस्त आहेत. वारंवार तक्रार करूनही महावितरण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांतून पुढील मागण्या जोर धरू लागल्या आहेत महावितरणने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी,लोंबकळणाऱ्या वीज तारा तात्काळ दुरुस्त कराव्यात व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांस भरीव मदत करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा