Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२६

मंगरुळ मैथील तरुण शेतकऱी शिवशंकर लबडे याचेअपघाती निधन, मंगरूळ व परिसरातून सर्वत्र हळहळ व्यक्त*

*मंगरूळ--प्रतिनिधी* *चांदसाहेब शेख* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
तुळजापूर तालुक्यातील मौजे मंगरूळ येथील तरुण, मनमिळावू आणि कष्टाळू शेतकरी शिवशंकर वामन लबडे (वय २३ वर्ष) याचे बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी मंगरूळ येथील नांदुरी रोड वरील दत्त मंदिराजवळ पिकअप ने जोरदार धडक दिल्याने अपघातात आकस्मित निधन झाले. त्यांच्या जाण्याने मंगरूळ गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शिवशंकर हा अतिशय हुशार, मेहनती आणि सर्वांशी प्रेमाने वागणारा तरुण होता. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याची त्याची जिद्द होती. वयाच्या २३ व्या वर्षीच त्याने शेतीची जबाबदारी समर्थपणे पेलली होती. त्याच्या अशा अकाली जाण्याने लबडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई-वडील,४ बहीणी असा मोठा परिवार आहे. *टाइम्स 45 न्यूज मराठी चॅनेल चे संपादक हुसेन मुलाणी यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली*🌷🌷🌷

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा