Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०२६

तुळजापुरातील शारदीय नवरात्रोत्सव निर्विघ्न पार पाडणाऱ्या प्रशासनाच्या पाठीवर कौतुकाची थाप! उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे आणि आगारप्रमुख महेश रामपुरे यांचा काँग्रेस पक्षाचे नगरसेवक यांच्या वतीने सन्मान!

 *मुख्य संपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9730867448*


तुळजापूर येथील  नवरात्रात लाखो भाविकांच्या उपस्थितीत शारदीय नवरात्र महोत्सव शांततेत आणि कोणत्याही अनुचित प्रकाराविना पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या पोलीस, नगरपालिका आणि एसटी महामंडळ प्रशासनाचा काँग्रेस पक्षाचे नगरसेवक तथा नगरपालिकेचे गटनेते अमोल कुतवळ नगरसेवक रणजीत इंगळे, आनंद जगताप, अक्षय परमेश्वर, किरण कदम यांच्या पदाधिकारी व सहकाऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील, नगरपालिका मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे आणि एसटी महामंडळाचे आगारप्रमुख महेश रामपुरे यांना पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.


शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांची मोठी गर्दी, वाहतूक नियोजन, कायदा व सुव्यवस्था आणि सार्वजनिक सुविधांचे व्यवस्थापन ही प्रशासनासमोरील मोठी आव्हाने होती. विविध विभागांनी समन्वयाने काम करत उत्सव शांततेत पार पाडल्याबद्दल या अधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात आले.


यावेळी प्रशासनाच्या कामगिरीचे अभिनंदन करत भाविकांना सुरक्षित आणि सुरळीत दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.


_______________________________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा