*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना 2026 केळी पीक
या फळ पिका विमा योजना मध्ये तालुकेतील महसूल मंडळ मध्ये केळी पिकाचे क्षेत्र 20 हेक्टर पेक्षा जास्त आहे ती सर्व महसूल मंडळे अधिसूचित क्षेत्र व केळी अधिसूचित पीक म्हणून मान्यता देण्यात आली आहे .राज्य शासन, केंद्र शासन व भारतीय कृषी विमा कंपनी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबविण्यात येत आहे .शेतकरी बंधू आणि भगिनींनी ज्यांनी केळीची लागवड केली आहे त्यांनी त्या गटाचा 7/12, 8 अ, आधार कार्ड, फार्मर आयडी ,बँक पासबुक व घोषणापत्र सह www. Pmfby gov inया संकेतस्थळावर स्वतः अँड्रॉइड मोबाईलच्या साह्याने किंवा महा-ई-सेवा केंद्र, सीएससी सेंटर किंवा ॲप द्वारे विमा हप्ता भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे .ही योजना कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकरी यांना ऐच्छिक स्वरूपात लागू आहे .ज्या शेतकरी बांधवांनी केळी पीक कर्ज घेतले असेल तर कर्ज घेतलेल्या बँक मध्ये बँकेला संमती देऊन हा विमा हप्ता जमा करणेस लेखी स्वरूपात कळवायचे आहे .केळी पिक विमा अंबिया बहारासाठीअंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2026 आहे .हेक्टरी 8500 विमा हप्ता रुपयांमध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टी, वादळी वारे, तपमानातील बदल, गारपीट व अति हवामान घटक या प्रमुख धोक्यासाठी लागू राहणार आहे .महसूल मंडलामध्ये कार्यरत असलेल्या स्वयंचलित हवामान केंद्र च्या हवामान घटक माहिती आधारे हवामान धोके निर्देशित कालावधी मध्ये लागू झाले तर शेतकरी बांधवांना 212500 रुपये प्रतिहेक्टरी विमा संरक्षण मिळणार आहे .यासाठी शेतकरी बंधू आणि भगिनींनी नजीकच्या सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा किंवा या कंपनीचा टोल फ्री क्रमांक180004195004वर संपर्क करून अडचणी प्रश्न व अधिक माहिती घेऊ शकतात.या दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी हवामान घटक वरील नुकसानीचे कवच चा लाभ घेण्यासाठी चे अहवान मंडळ कृषी अधिकारी अकलूज ISO9001:2015सेवारत्न श्री सतीश शांताबाई कुंडली क कचरे यांनी केले आहे .




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा