Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२६

२६ व्या वाढदिवसानिमित्त मूकबधिर शाळेत आनंदाचा क्षण; सोहेल दारूवाले यांचा अनोखा सामाजिक उपक्रम

*करमाळा तालुका-- प्रतिनिधी* *आलिम. शेख* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
*दिनांक ९ ऑक्टोबर रोजी सोहेल मुस्ताक दारूवाले यांनी आपल्या २६ व्या वाढदिवसानिमित्त मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करून सामाजिक बांधिलकी जपली.*
वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी मूकबधिर शाळेला भेट देत विद्यार्थ्यांसोबत आनंदाचे क्षण घालवले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी जेवणाचीही व्यवस्था केली. विद्यार्थ्यांसोबत आनंद वाटून घेत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत त्यांनी वाढदिवस साजरा करण्याचा एक स्तुत्य आदर्श समाजासमोर ठेवला. या उपक्रमावेळी त्यांच्यासोबत सलीम सय्यद, साहिल शेख (भाऊ), यश भुजबल, साकिब तंबोली, अमन घोडके, वरद वागडे आणि अब्रार पठाण हे मित्रपरिवार उपस्थित होते. या उपक्रमामुळे वाढदिवसाचा आनंद द्विगुणित झाला. स्वतःच्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेत विद्यार्थ्यांना प्रेम, आपुलकी आणि जेवणाच्या माध्यमातून आनंद देण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद ठरला. **वाढदिवस केवळ उत्सव म्हणून न साजरा करता सामाजिक बांधिलकी जपत इतरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे, हाच या उपक्रमाचा खरा संदेश ठरला.** सोहेल मुस्ताक दारूवाले यांच्या या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा