पुणे, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
सकल जैन समाज, पुणे- पिंपरी-चिंचवड आणि आगाज २०२६ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी पुण्यात 'आंतरराष्ट्रीय
भक्तामर दिवस २०२६’ निमित्त ‘भक्तामर भक्त कल्याण महोत्सवा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. अभिनव मानतुंग विश्वसंत, भक्तामरवाले बाबा *आचार्य श्री प्रणाम सागरजी महाराज* यांच्या विशेष प्रेरणा व मार्गदर्शनातून आयोजित या महोत्सवाच्या माध्यमातून भक्तामर स्तोत्राविषयी श्रद्धा, भक्ती, संस्कार आणि श्रमणोपाध्याय श्री विभंजनसागरजी गुरुदेव यांच्या मंगल सानिध्यात जैन सामाजिक एकतेचा संदेश देण्यात येणार आहे.
पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरातील सुमारे ३० दिगंबर जैन मंदिरांचा सहभाग या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार असून, जैन समाजाच्या एकतेचे आणि सामूहिक भक्तीचे भव्य दर्शन या निमित्ताने घडणार आहे.
महोत्सवाची सुरुवात सकाळी ६.४५ वाजता भव्य भक्तामर शोभायात्रेने होणार असून सिंहगड रोड, राजाराम पूल ते बडजात्या मंडपम, पंडित फार्म, डी. पी. रोड, कर्वेनगर, पुणे असा शोभायात्रेचा मार्ग असणार आहे. भक्तामर स्तोत्राचा जयघोष, भक्तिमय वातावरण आणि जैन समाजातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे शोभायात्रा विशेष आकर्षण ठरणार आहे. यानंतर पंडित फार्म, बडजात्या मंडपम, डी. पी. रोड, कर्वेनगर, पुणे येथे सकाळी ७ वाजेपासून मुख्य कार्यक्रमास प्रारंभ होईल.
भक्तामर हीलिंग व विशेष गर्भसंस्कार :
महोत्सवातील एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून सकाळी ७.३० वाजता विशेष भक्तामर हीलिंग व गर्भसंस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ वाजून ९ मिनिटे ९ सेकंद नंतर हजारो श्रावक श्राविका यांच्या उपस्थितीत सामुहिकपणे भक्तामर स्तोत्राचा सामूहिक निनाद सुरू होणार आहे.
यावेळी भक्तामर स्तोत्रा सोबत ऋद्धी मंत्र व सूर्य मंत्राचे सामूहिक पठण करण्यात येणार असून, भक्तांचे आध्यात्मिक शुद्धीकरण, ध्यान आणि भक्तामर हीलिंग व संस्काराचा अनुभव देण्यात येणार आहे.
'भक्तामर आगाज–२’ हा या महोत्सवाचे आणखी एक प्रमुख आकर्षण असणार आहे. प्रथमच सामूहिक क्षमावाणीचा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला असून, समस्त दिगंबर जैन समाजाने एकाच व्यासपीठावर एकत्र येऊन ‘एक समाज, एक मंच, एक भावना आणि एकता’ हा संदेश देण्याचा संकल्प केला आहे. यासोबतच भक्तामर स्तोत्रावर आधारित विशेष काव्य व नृत्य सादरीकरण करण्यात येणार असून, भक्ती, संस्कार आणि कलात्मकतेचा अनोखा संगम उपस्थितांना अनुभवता येणार आहे.
या ऐतिहासिक भक्तामर महोत्सवात पुणे तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्व जैन बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन भक्ती, संस्कार आणि जैन एकतेचा हा अनोखा सोहळा यशस्वी करावा, असे आवाहन सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
भक्तामर स्तोत्रामध्ये प्रामुख्याने जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर भगवान आदिनाथांच्या गुणांचे, ज्ञानाचे, सामर्थ्याचे आणि पवित्रतेचे वर्णन केले आहे. ‘भक्तामर’ या नावाचा अर्थ भक्तांच्या अंतःकरणात भक्ती आणि श्रद्धा जागृत करणारा असा घेतला जातो.
परंपरेनुसार या स्तोत्रात ४८ गाथा आहेत. प्रत्येक गाथेला आध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. अनेक जैन बांधव श्रद्धेने दररोज भक्तामर स्तोत्राचे पठण करतात. भक्तामर स्तोत्राचे श्रद्धेने पठण केल्यामुळे मनाला शांती, एकाग्रता, सकारात्मकता आणि आत्मविश्वास मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नियमित पठणातून तीर्थंकरांच्या गुणांचे चिंतन, आत्मशुद्धी आणि सदाचाराची प्रेरणा मिळते.
हे स्तोत्र केवळ संकट दूर करण्यासाठी नव्हे, तर आत्मकल्याण, भक्ती, संयम आणि आध्यात्मिक उन्नती यासाठी महत्त्वाचे मानले जाते. भक्तामर स्तोत्र यामध्ये बाह्य परिस्थितीपेक्षा मनाची शुद्धता, श्रद्धा, संयम आणि सत्कर्म अधिक महत्त्वाचे आहेत.
“णमो अरिहंताणं” या भावनेतून तीर्थंकरांच्या गुणांना नमन करणे आणि त्यांच्या आदर्शांचा आपल्या जीवनात स्वीकार करणे, हाच भक्तामर स्तोत्राचा मूलभूत आध्यात्मिक संदेश असून याची रचना दिगंबर आचार्य मानतुंगचार्य यांनी केली आहे.
बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
आचार्य श्री प्रणाम सागरजी महाराज यांच्या अध्यात्मिक मार्गदर्शनाखाली पुणे शहर रचणार भक्तामर भक्तीचा नवा इतिहास ! दि. ९ ऑक्टोबर रोजी 'आंतरराष्ट्रीय भक्तामर दिवस २०२६’ निमित्त भव्य भक्तामर भक्त कल्याण महोत्सवाचे साक्षीदार बनण्याची सर्वांना सुवर्णसंधी !
आचार्य श्री प्रणाम सागरजी महाराज यांच्या अध्यात्मिक मार्गदर्शनाखाली पुणे शहर रचणार भक्तामर भक्तीचा नवा इतिहास ! दि. ९ ऑक्टोबर रोजी 'आंतरराष्ट्रीय भक्तामर दिवस २०२६’ निमित्त भव्य भक्तामर भक्त कल्याण महोत्सवाचे साक्षीदार बनण्याची सर्वांना सुवर्णसंधी !
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा