Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२६

डॉक्टर ह .भ .प . रामायणाचार्यश्री संजय गीते यांची महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स असोसिएशन पुणेच्या प्रसिद्धी प्रमुख पदी वर्णी _____________

*मुख्य संपादक* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-9730867448*
महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणे या संस्थेची सर्वसाधारण वार्षिक सभा दिनांक 12 / 9 / 2026 रोजी पुणे सदाशिव पेठ येथे संपन्न झाली . या सभेमध्ये रुपीनगर येथील रहिवासी तसेच जामखेड तालुका पेन्शनर शिक्षक संघटना अध्यक्ष .तथा साहित्यिक, रामायणाचार्य, योगशिक्षक व समाजसेवक या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणे च्या प्रसिद्धी प्रमुख पदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली .
यावेळेस महाराष्ट्र पेंशनर्सअसोसिएशन चे अध्यक्ष श्री .एन डी. मारणे . कार्याध्यक्ष श्री . वसंत वाबळे, कोषाध्यक्ष श्री . वासुदेव साठे . सरचिटणीस श्री . सुभाष पवार तसेच संपूर्ण कार्यकारिणी यांनी संजय गीते यांच्या संघटनेच्या कार्याचा लेखाजोखा पाहून त्याचप्रमाणे जामखेड तालुका व अहिल्यानगर जिल्ह्यातील संघटनेचे, पेन्शनर शिक्षकांची केलेली कामे व पंचायत समिती मधून भ्रष्टाचार निर्मूलन या उपक्रमाच्या कार्याचा गौरव करून त्यांचे कौतुक केले
व यापुढे महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन या राज्यस्तरीय संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख पदाची धुरा आपण सांभाळावी, व राज्यातील सर्वच जिल्ह्यांसह सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्या बातमीद्वारे विविध वृत्तपत्रातून समाजापुढे आणाव्यात. सेवानिवृत्तांचे दुःख, वेदना सरकारला व समाजाला दाखवून द्याव्यात असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले . यावेळेस पूर्ण महाराष्ट्रातील निवृत्तशिक्षकांनी, अध्यक्ष व कार्यकारणीने श्री संजय गीते यांचे अभिनंदन केले . तसेच दिनांक 14 10 2026रोजी जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री शुभम जाधव यांनी संजय गीते यांच्या निवडीचा गौरव करून पेन्शनर लोकांच्या समस्या ते सातत्याने व प्रखरतेने मांडत असतात . आज पर्यंत त्यांनी अनेक प्रकारच्या समस्या माझ्यासमोर मांडून त्या पेन्शनर लोकांच्या समस्या सोडवल्या आहेत . म्हणून त्यांनी डॉक्टर गीते यांच्या कार्याचा उल्लेख केला . अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष श्री .द.मा. ठुबे सरचिटणीस श्री ब .द. उबाळे, तसेच दक्षिण विभाग प्रमुख श्री ज्ञानेश्वर थोरात या प्रमुख व धुरंधर नेत्यांनी डॉक्टर संजय गीते यांचे अभिनंदन केले . सत्काराचे प्रसंगी संजय गीते यांनी मी प्रसिद्धी प्रमुख या पदावर गेल्याने भारावून गेलो नाही . कारण माझ्या कार्याची जबाबदारी व माझे काम वाढलेले आहे याची मला जान आहे . आणि मी ते सक्षमपणे समाज व सरकार पुढे मांडीन, पेन्शनर शिक्षकांच्या समस्या मांडिल व त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीन असे प्रतिपादन केले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा