*अकलूज प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
अकलूजचे ग्रामदैवत श्री अकलाई देवी मंदिराकडे जाणाऱ्या पुलावरील रस्ता अत्यंत खड्डेमय झाला होता. आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व भाजप अकलूज शहराच्या वतीने दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी अकलूज नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली होती. या निवेदनाचा सतत पाठपुरावा केल्यानंतर, नगरपरिषदेने अखेर सदर नवीन रस्त्याचे काम पूर्ण केले, यामुळे भाविकांचा आणि नागरिकांचा मोठा प्रश्न मार्गी लागला असून अकलूज शहरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. याबद्दल भारतीय जनता पार्टी अकलूज शहराच्या वतीने नगरपरिषदेचे आभार मानण्यात आले.
हे निवेदन आरोग्यदूत लोकप्रिय दमदार मा आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले होते.
याप्रसंगी खालील पदाधिकारी उपस्थित होते:
विक्रम गायकवाड (उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी अकलूज शहर)
अमोल बाळासाहेब माने (सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी अकलूज शहर)
जतीन वायदंडे (उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा)
शशिकांत ननवरे
रविवार, ११ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
अकलाई मंदिराकडील पुलावरील रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण; भाजपच्या पाठपुराव्यामुळे भाविकांचा प्रश्न मार्गी
अकलाई मंदिराकडील पुलावरील रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण; भाजपच्या पाठपुराव्यामुळे भाविकांचा प्रश्न मार्गी
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा