*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा पोलीस कोठडीत असताना स्वतःला जखमी करून घेतलेल्या कृष्णा ज्ञानदेव मोहिते वय 38 राहणार बिटरगाव सांगवी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाले प्रकरणी एका पीएसआय सह दोन पोलीस कॉन्स्टेबल अशा तिघांना निलंबित करण्यात आली आहे या प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत सुरू असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची शिफारस तपास अधिकाऱ्यांनी केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याचे समजते
कृष्णा ज्ञानदेव मोहिते यांच्याविरुद्ध त्यांच्या नातेवाईक असलेल्या महिलेने पोकसो कायदा तसेच माहिती व तंत्रज्ञान कायदे अंतर्गत फिर्याद दिली होती या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला 20 ऑक्टोंबर 2026 ला अटक करण्यात आली होती त्यानंतर न्यायालयाकडून त्याला पोलीस कोठडी मिळाली होती
पोलीस कोठडीतील पहिल्याच दिवशी 20 ऑक्टोबर रोजी कृष्णा मोहिते यांनी भिंतीवर डोके आपटून स्वतःला जखमी करून घेतले होते त्यानंतर त्याला उपचारासाठी प्रथम करमाळा येथील कुटीर रुग्णालयात आणि पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरू असताना 23 ऑक्टोबर रोजी त्याचा मृत्यू झाला पोलीस कोठडीतील आरोपीचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली नातेवाईकांनी त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती दरम्यान या प्रकरणाचा तपास गुप्तचर विभागाकडे सोपविण्यात आल्याची माहिती असून सीआयडीमार्फत ही तपास सुरू आहे या तपासा दरम्यान संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्यात येत आहे या प्रकरणाच्या अनुषंगाने त्याच दिवशी कार्यरत असणारे पीएसआय उघडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल रणदील आणि कादगे या तिघांना निलंबित करण्याची शिफारस केली होती त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिघांना निलंबित केले असल्याचे समजते दरम्यान कृष्णा मोहिते यांच्या मृत्यूची नेमकी परिस्थिती काय होती आणि या प्रकरणात कोणाची जबाबदारी निश्चित होते हे सीआयडीच्या पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे
करमाळा पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या कृष्णा मोहिते यांच्या प्रकरणानंतर तिघा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याने संपूर्ण पोलीस खात्यात एकच खळबळ माजली आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा